Take a fresh look at your lifestyle.

..म्हणून केरळात भाजपला मतांचा दुष्काळ; ‘या’ नेत्याने दिला घरचा आहेर

दिल्ली :

Advertisement

देशात करोना काळात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, पाँडेचेरी आणि आसाम या राज्यात निवडणुका आहेत. पश्चिम बंगाल आणि आसामात भाजप प्रबळ दावेदार आहे. मात्र दक्षिणेत या पक्षास अद्याप अपेक्षित यश मिळालेली नाही. केरळ राज्यात तर भाजप स्पर्धेत दिसत नाही. कारण या राज्यात भाजपला मते मिळत नाहीत, याचे खरे कारण याच पक्षाचे नेते ओ. राजगोपाल यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत दिले आहे.

Advertisement

 केरळमध्ये येत्या ६ एप्रिलपासून पहिल्या टप्प्यातील मतदानास सुरुवात होणार आहे. या राज्यात भाजपला मोठ्या अपेक्षा आहेत. गेल्या काही वर्षांपासून भाजपने या राज्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. मात्र पक्षाच्याच नेत्याने झटका दिला आहे. या राज्यात भाजपला मतदान का होत नाही, याच कारण त्यांनी सांगितलं आहे. या प्रश्नाचं उत्तर म्हणजे केरळ इतर प्रदेशांपेक्षा वेगळा आहे.

Advertisement

येथील नागरिक उच्च शिक्षित असल्याने भाजपला मते देत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. देशातील हरयाणा, त्रिपुरा या राज्यात पक्षाने आगेकूच केली आहे. पश्चिम बंगाल मध्ये सुद्धा कमी कालावधीत पक्षाने रणनिती तयार केली आहे. मग, केरळमध्ये भाजप सक्षम का ठरत नाही, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना भाजपला येथे समर्थन न मिळण्यास दोन तीन कारणे आहेत. केरळचा साक्षरता दर ९० टक्के आहे. येथील लोक विचार करतात, तर्क लावतात नव्हे शिक्षीत लोकांची ती सवयच आहे. केरलमध्ये अल्पसंख्यांक जवळपास ४५ टक्के आहे. त्यामुळे प्रत्येक कॅल्क्यूलेशनमध्ये ही बाब येतेच. तसेच केरळची तुलना अन्य राज्यांशी केली जाऊ शकत नाही, तरी देखील आम्ही येथे चांगले करण्याचा प्रयत्न करतोय असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply