पुणे :
केंद्र सरकारने आता शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्या (farmers producer company) बनवून त्याद्वारे शेतकऱ्यांना उन्नतीचा मार्ग दाखवण्याचे ठरवले आहे. जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्या मार्गदर्शनाखी आता भारतात ही एक मुव्हमेंट आकार घेत आहे. त्याद्वारे देशभरात तब्बल 10 हजार शेतकरी उत्पादक कंपन्या बनवल्या जाणार आहेत.
शेतकरी उत्पादक कंपन्या उभारण्यासाठी राज्यात समूह आधारित व्यावसायिक संस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची राज्यस्तरीय बैठक नुकतीच कृषिमंत्री दादा भुसे यांनी मंत्रालयात घेतली. केंद्र शासनामार्फत देशात दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या करण्याची योजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी यानिमित्ताने सांगितले आहे.
कृषिमंत्री भुसे यांनी या बैठकीत सांगितलेले मुद्दे असे :
- योजना यशस्वी करण्यासाठी पीक पद्धती, कृषी विद्यापीठ, सेवाभावी संस्था यांच्या विविध कार्यक्रमांची सांगड घालावी.
- या शेतकरी उत्पादक कंपन्या केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात शेतकऱ्याला फायदा देणाऱ्या असाव्यात.
- या संस्थांनी कृषी विभागाशी समन्वय ठेवून शेतकऱ्यांना एकत्रित करून प्रत्यक्ष काम करणारी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करावी.
- चांगला प्रकल्प आखण्यात आला असून त्याचा हेतू साध्य होण्यासाठी संस्थांनी मनापासून काम करावे
- शेतकऱ्यांना प्रत्यक्षात लाभ मिळावा, त्यांची प्रगती व्हावी
- शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन कृषी उत्पादनात वाढ व्हावी याला सुसंगत असे काम संस्थांनी करावे
संपादन : संतोष वाघ
कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.
- बाब्बो.. भयंकरच की..; योगीराज्यात करोना तपासणीचे ‘असे’ आहे वास्तव; पहा NBT च्या ग्राउंड रिपोर्टचे मुद्दे
- अशी घ्या काळजी; मोबाईलमध्ये ‘ही’ माहिती ठेवाल, तर बँक खातं होईल झटक्यात खाली..!
- म्हणून सिटी बँकेने घेतला बोरिया बिस्तर आवरण्याचा निर्णय; ग्राहक-नोकरदारांवर होणार ‘हा’ परिणाम
- रोहित पवार ब्लॉग : याबाबत निष्काळजी राहून चालणार नाही, अन्यथा…; पहा काय आवाहन केलेय त्यांनी
- दानधर्मातही धोका; श्रीराम मंदिरासाठी दिलेले ‘इतक्या’ कोटींचे चेक ‘बाउन्स’..!