Take a fresh look at your lifestyle.

अरे वा… ही स्कूटर २० पैशात धावणार तब्बल एक किलोमीटर..!

पुणे :

Advertisement

पेट्रोल डिझेलच्या वाढत जाणाऱ्या दरांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे इलेक्ट्रीक वाहनांकडे कल वाढत आहेत. इलेक्ट्रीक दुचाकी वाहने रस्त्यावर दिसू लागली आहेत. नेमकी ही गोष्ट लक्षात घेऊन आयआयटी दिल्लीच्या इनक्युबेटेड स्टार्टअप गॅलिओस मोबिलिटीने होप नावाचे इलेक्ट्रिक स्कूटर विकसित केले आहे, जे २० पैशात एक किलोमीटरपर्यंत धावेल. डिलिव्हरी आणि स्थानिक प्रवास यासाठी ही एक परवडणारी स्कूटर आहे. ही स्कूटर ताशी २५ किमी टॉप स्पीड प्रदान करते.

Advertisement

या स्कूटरची बॅटरी चार तासात पूर्णपणे चार्ज होते. यामध्ये ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार दोन वेगवेगळ्या रेंजमध्ये ५० किमी आणि ७५ किमी बॅटरी क्षमता निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. आयआयटी-दिल्लीनुसार ही स्कूटर बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम, डेटा मॉनिटरिंग सिस्टम आणि पेडल असिस्ट युनिट सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे. त्यात आयओटी आहे जे डेटा विश्लेषकांद्वारे ग्राहकांना त्यांच्या स्कूटरबद्दल नेहमी माहिती देते.

Advertisement

अशा वैशिष्ट्यांमुळे, होप भविष्यातील स्मार्ट आणि कनेक्ट केलेल्या स्कूटर्सच्या श्रेणीमध्ये येते. प्रवासात ग्राहक त्यांच्या सोयीनुसार पेडल किंवा थ्रॉटलचा पर्याय निवडू शकतात. सोयीस्कर पार्किंगसाठी होप विशेष रिव्हर्स मोड तंत्रज्ञानाने सज्ज आहे, ज्याच्या मदतीने कठिण ठिकाणी देखील स्कूटर पार्क केली जाऊ शकते. होपमध्ये अत्याधुनिक वापरासाठी तयार केलेली मजबूत आणि कमी वजनाची फ्रेम देखील आहे.

Advertisement

गॅलियस मोबिलिटी अशा कंपन्यांपैकी एक आहे ज्याद्वारे स्कूटरमध्ये पेडल असिस्ट सिस्टमसारखे विशेष वैशिष्ट्य दिले गेले आहे. सर्व सामान्य नागरिकांचा विचार करुन या स्कूटरची किंमत ठरवली आहे. या स्कूटरची किंमत ४६ हजार ९९९ इतकी असून सर्वसामान्यांना परवडण्यासारखी आहे.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply