Take a fresh look at your lifestyle.

वाव.. तर भारत-पाकिस्तानमध्ये होणार टी २० मालिका..!

पुणे :

Advertisement

भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या संघांमध्ये गेल्या ९ वर्षांपासून एकही द्विपक्षीय मालिका झालेली नाही. मात्र, यावर्षी क्रिकेट रसिकांची ही हौस भागणार असल्याचे चित्र आहे. पाकिस्तानी मीडियाने याबाबतचा दावा केला असून याचवर्षी भारत-पाकिस्तानमध्ये टी २० मालिका खेळली जावू शकते.

Advertisement

पाकिस्तानी मीडियामध्ये आलेल्या बातमीनूसाक पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला पाकिस्तान सरकारच्या अधिकाऱ्यांकडून या मालिकेबाबत माहिती देण्यात आली असून पाकिस्तानी वृत्तपत्र डेली जंगने दिलेल्या वृत्तानुसार भारत-पाकिस्तान यांच्या ३ टी २० सामन्यांची मालिका होवू शकते, असा अंदाज आहे.

Advertisement

पाकिस्तान सरकारनेही भारताविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज राहा, असं सांगण्यात आल्याचं पीसीबीचा अधिकारी म्हणाल्याचं वृत्त डेली जंगने दिलं आहे. हे जर खरं असेल तर तब्बल ९ वर्षांनतर भारत आणि पाकचे संघ मालिकेच्या माध्यमातून एकमेकांसमोर भिडतील. तीन टी २० सामन्यांची ही मालिका होवू शकते.

Advertisement

दरम्यान, याबाबत बीसीसीआयकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. जोपर्यंत पाकिस्तानकडून दहशतवादाला आळा घातला जात नाही, तोपर्यंत क्रिकेट खेळलं जाणार नाही, अशी भूमिका भारत सरकारने याआधी अनेकवेळा स्पष्ट केली आहे. पाकिस्तान आणि भारत फक्त आयसीसी स्पर्धा आणि आशिया कपमध्येच एकमेकांविरुद्ध खेळतात.  

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply