Take a fresh look at your lifestyle.

सलग दुसऱ्या दिवशी मोदी सरकारने दिला दिलासा; पहा किती कमी झालेत इंधनाचे दर


मुंबई :

Advertisement

आंतरराष्ट्रीय बाजरात कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असल्याने सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या दरात कपात केली आहे. आज गुरुवारी देशभरात पेट्रोल २१ पैसे तर डिझेल २० पैशांनी स्वस्त झाले आहे.

Advertisement

विशेष म्हणजे मागील फेब्रुवारा महिन्यात इंधनाच्या दरात तब्बल १६ वेळेस दरवाढ झाली होती. मात्र, यावर सातत्याने टिका झाल्याने अखेर पेट्रोल कंपन्यांनी बुधवारपासून दर कमी करण्यास सुरुवात केली आहे. काल बुधवारी कंपन्यांनी पेट्रोलमध्ये १८ पैसे आणि डिझेलमध्ये १७ पैशांची कपात केली होती. दोन दिवस झालेल्या दर कपातीनंतर पेट्रोल ३९ पैसे तर डिझेल ३७ पैसे स्वस्त झाले आहे.

Advertisement

आजच्या दर कपातीने मुंबईत पेट्रोलचा भाव ९७.१९ रुपये झाला आहे. तर डिझेलचा भाव ८८.२० रुपये झाला आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.७८ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ८१.१० रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.७७ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८६.१० रुपये भाव आहे.

Advertisement

युरोपात करोनाची दुसरी लाट धडकल्याचे सध्या चित्र आहे. तेथील करोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने काही देशांनी लॉकडाउनचा मार्ग पत्करला आहे. त्यामुळे पुन्हा तेलाची मागणी कमी होईल, या भीतीने साठेबाजांनी तेलाची विक्री केली आहे. यामुळे मागील आठवडाभरात कच्च्या तेलाच्या किमतीत १५ टक्के घसरण झाल्याचे बोलले जात आहे.

Advertisement

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलवर राज्य आणि केंद्र सरकारकडून कर आकारले जातात. त्यामुळे ग्राहकांना जास्त किंमत मोजावी लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून तर पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांचे बजेट कोलमडले होते. सरकारच्या या दुहेरी कर पद्धतीवर टिका करण्यात येते. मात्र, सरकारच्या धोरणात अद्याप तरी कोणताही बदल झालेला नाही. तीन आठवड्यांनंतर इंधनाचे दर थोडे कमी झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply