Take a fresh look at your lifestyle.

दुसर्या वन डेआधीच टीम इंडियाला धक्का; पहा कोणता खेळाडू झालाय दुखापतग्रस्त

मुंबई :

Advertisement

इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेच्या दुसर्‍या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का बसला असून खांद्याच्या दुखापतीमुळे संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर मालिकेच्या उर्वरित दोन सामन्यांमधून बाहेर पडला आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याला ही दुखापत झाली. फिल्डिंग दरम्यान श्रेयस अय्यरच्या डाव्या खांद्याचे हाड सरकले आहे.

Advertisement

 याबाबत बीसीसीआयने सांगितले की, फिल्डिंग दरम्यान श्रेयस अय्यरच्या डाव्या खांद्याचे हाड आठव्या षटकात घसरले. मालिकेतील बाकीचे सामने तो खेळू शकणार नाही. शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर जॉनी बेअरस्टोच्या शॉटवर श्रेयसने चेंडू रोखण्यासाठी डाय मारली, तेव्हा ही घटना घडली. तो वेदनांनी विव्हळत होता. त्याला पुढील स्कॅनसाठी नेण्यात आले आहे.

Advertisement

दरम्यान, वनडे सामन्यांना मुकावे लागल्यानंतर श्रेयसच्या अडचणीत वाढ होणार आहे.कारण तो आयपीएल १४ च्या मोसमात खेळणार कि नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे. बीसीसीआयच्या एका सूत्रांनी पीटीआयला सांगितले की,  आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यात  श्रेयस खेळण्याची शक्यता नाही. श्रेयस हा दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटलने मागील हंगामात आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. श्रेयसच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटलचे कर्णधारपद ऋषभ पंत,  ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ किंवा ऑफस्पिनर आर. अश्विन यांच्याकडे सोपविण्यात येऊ शकते.

Advertisement

 भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा दुसरा सामना 26 मार्च रोजी खेळला जाईल. हा सामना पुण्यातच होईल. तीन सामन्यांच्या मालिकेत भारत 1-0 ने आघाडीवर आहे. पहिल्या सामन्यात भारताने इंग्लंडचा 66 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने 50 षटकांत 317 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडचा डाव  251 धावांत आटोपला. 98 धावांची खेळी करणारा भारतीय सलामीवीर शिखर धवनला सामनावीर पुरस्कार मिळाला.

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply