Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. म्हणून तहसीलदारांनी जाळल्या तब्बल 20 लाखांच्या नोटा; पहा कुठे घडली ही ‘कर्तव्यदक्षता’..!

महसूल विभागाचे आणि पैशांचे नाते पोलीस यंत्रणेपेक्षा जास्त घट्ट आहे. पोलिसांचा एकवेळ सगळ्यांशी संबंध येत नाही. मात्र, जीवनात एकदाही महसूल यंत्रणेला किमान 15 रुपये तरी लाज दिली नसेल असा अवलिया या इंडियात सापडणे मुश्कील आहे. त्याच महसूलदार विभागाच्या तहसीलदार साहेबांनी तब्बल 20 लाख रुपये जाळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे ही घटना काळजीपूर्वक वाचा आणि आवडली तर शेअर करा.

Advertisement

होय, आपल्या महाराष्ट्र राज्यातली ही घटना नाही. ही आहे राजस्थान राज्यातील घटना. अँटी करप्शन ब्युरो अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकल्यावर त्यापासून वाचण्यासाठी हा दिव्य असा प्रकार ‘आदरणीय’ तहसीलदार साहेबांनी केला आहे. अँटी करप्शन ब्युरोचे अधिकारी पाहताच आपल्या एका खोलीत स्वतःला कोंडून घेत साहेबांनी 20 लाख रुपये किमतीच्या नोटांना चक्क आग लावली. 

Advertisement

कोणाही भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचारी आणि राजकीय नेत्यांनी आदर्श घ्यावा अशीच ही घटना आहे. राजस्थानच्या सिरोही येथील पिंडवाडाचा तहसीलदार कल्पेश जैन यांनी हा प्रकार करून जगभरात नाव प्रकाशझोतात आणलेले आहे. सिरोहीतील भावरी येथे महसूल अधिकारी पर्बत सिंहला क लाख रुपयांच्या लाच प्रकरणी अटक केल्यावर तहसीलदार जैन यांचे नाव समोर आले. एसीबीचे अधिकारी येण्यापूर्वीच जैन यांना खबर लागली होती.

Advertisement

मग त्यांनी स्वतःला एका खोलीत बंद करून घेत नोटांचे बंडलच्या बंडल हातात घेऊन पेटत्या गॅस स्टोव्हवर ठेवले आणि सर्व नोटा जाळल्या. ACB चे अधिकारी त्याला दार उघडण्याची विनंती करत असतानाही तहसीलदार साहेबांचे कर्तव्य बजावण्याचे काम चोखपणे सुरू होते. या संपूर्ण घटनेचा अधिकाऱ्यांनी व्हिडिओ तयार केला आहे. त्यामुळे कुठे याची जगजाहीर वाच्यता झाली आहे.

Advertisement

एका तासाच्या खटाटोपानंतर अखेर दार कापून उघडण्यात आल्यावर नोटा जाळण्याचा खरा सत्यवादी प्रकार पुढे आला. तहसीलदार साहेबांनी एकूण 20 लाख रुपयांच्या नोटा जाळल्या. त्यातील काही अर्धवट जळालेल्या नोटा ACB च्या टीमने जप्त केल्या आहेत. मूलसिंह नावाच्या एका व्यक्तीने ACB कडे तक्रार दिल्याने या ‘कर्तव्यनिष्ठ’ अधिकाऱ्याचे प्रताप जगासमोर आलेले आहेत.

Advertisement

एक कंत्राट देण्यासाठी तहसीलदार साहेबांनी ‘फ़क़्त’ 5 लाख रुपयांची लाच मागून यासंदर्भात महसूल अधिकारी पर्बत सिंह याच्याशी बोलण्यास सांगितले होते. त्यानुसार पर्बत सिंहने एक लाख रुपये घेऊन नंतर 4 लाख देण्यास सांगितले होते. हेच एक लाख घेत असताना अँटी करप्शन ब्युरोने पर्बत सिंह याला ताब्यात घेतले आणि दरम्यान तहसीलदार साहेबांनी नोटा जाळण्याचा महत्वाचा प्रयत्न केला.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply