Take a fresh look at your lifestyle.

करोना अपडेट : ‘या’ दहा जिल्ह्यांनी वाढवले मोदी सरकारचे टेन्शन..!

मुंबई :

Advertisement

देशभरात करोना वाढत असला तरी या आजाराचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. विशेष म्हणजे देशात सर्वाधिक करोना प्रकरणे असणाऱ्या दहा जिल्ह्यांमध्ये तब्बल ९ जिल्हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे राज्याने केंद्र सरकारचे टेन्शन वाढवले आहे.

Advertisement

देशात करोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे केंद्र सरकार सतर्क झाले आहे. देशातील या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. तसेच आरोग्य विभागाकडून सातत्याने आढावा घेण्यात येत आहे. देशात सर्वाधिक करोना प्रकरणे असणाऱ्या दहा जिल्ह्यांची यादी केंद्र सरकारने जाहीर केली आहे. यामध्ये नऊ जिल्हे महाराष्ट्रातील तर एक जिल्हा कर्नाटक राज्यातील आहे.

Advertisement

सर्वाधिक करोना रुग्ण असणारे राज्यातील पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव, अकोला हे नऊ जिल्हे तर कर्नाटकमधील बंगळुरू शहर या एक जिल्ह्याचा समावेश आहे. महाराष्ट्रात पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे आणि नाशिक हे टॉपमध्ये आहेत. याच जिल्ह्यांमध्ये कोरोनाची प्रकरणं झपाट्याने वाढत आहेत. शिवाय देशात दोन राज्यांनीच चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रासह पंजाब राज्यांमध्येही कोरोनाची सर्वात जास्त रुग्ण आहेत.

Advertisement

देशाच्या राजधानीतही करोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे दिल्ली सरकारने मॉल, सिनेमाघर, साप्ताहिक बाजार, मेट्रो सेवा या ठिकाणांना संक्रमण पसरवणारे संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता हरयाणा सरकारनेही निर्बंध आधिक कठोर केले आहेत.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply