Take a fresh look at your lifestyle.

कांदा हमीभाव मागणी : ३० रुपये प्रतिकिलोसाठी प्रयत्न, ग्रामपंचायतीचाही पाठींबा

नाशिक :

Advertisement

कांदा या राजकीयदृष्ट्या संवेदनशील पिकाच्या बाजारात केंद्र सरकारच्या वारंवार होणाऱ्या हस्तक्षेपाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे इतर शेतमालाप्रमाणे कांद्याला ३० रुपये प्रतिकिलो हमीभाव देण्यासाठी कांदा उत्पादक शेतकरी संघटना प्रयत्नशील आहे.

Advertisement

नायगाव (ता. सिन्नर) येथील ग्रामपंचायतीने सरकारने शेतकऱ्यांच्या कांद्याला प्रतिकिलो ३० रुपये हमीभाव द्यावा, या मागणीला पाठिंबा असल्याचे लेखी पत्र महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्याकडे सुपूर्द केले आहे. त्यामुळे आता या मागणीसाठी ग्रामपंचायतीचा ठराव हेही नवे हत्यार म्हणून पुढे येत आहे.

Advertisement

केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या कांद्याला कमीत कमी ३० रुपये प्रतिकिलोचा हमीभाव देण्यात यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने दि. १५ मार्च २०२१ पासून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथून सुरू केलेल्या देशव्यापी व राज्यव्यापी मोहिमेस सुरुवात केली आहे.

Advertisement

नायगाव ग्रामपंचायतच्या सरपंच मनीषा कदम, उपसरपंच भाऊसाहेब सांगळे, माजी सरपंच विष्णू पाबळे, भाऊसाहेब लोहकरे, तानाजी सानप, वर्षा जेजूरकर, चंद्रभान पिंपळे, एकनाथ जारकड, ग्रामसेवक डी. झेड. बन, कांदा उत्पादक शेतकरी सोमनाथ गिते, अर्जुन सानप, अतुल गिते, मंगेश गिते आदींनी या मागणीला आपला पाठींबा दिला आहे.

Advertisement

दिघोळे यांनी सांगितले की, देशात सर्वाधिक कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. परंतु दरवर्षीच काही महिन्यांचा अपवाद वगळता सातत्याने शेतकऱ्यांच्या कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळतो. त्यामुळे कांदा उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होते. कांदा उत्पादकांना कर्जबाजारी होण्याची वेळ येते. हे चित्र कायमस्वरूपी थांबवण्यासाठी व कांदा उत्पादकांच्या कांद्याला नियमितपणे उत्पादन खर्चापेक्षा जास्त दर आवश्यक आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply