Take a fresh look at your lifestyle.

वन्यजीवांसाठी ‘या’ शहरात अनोखा उपक्रम; चक्क महापालिकेने घेतला पुढाकार..!

पुणे :

मार्च महिन्यात कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याची टंचाई निर्माण होते. या काळात वन्यजीवांची फरपट होते. पाणी आटल्याने त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. पाण्या अभावी प्राणी, पक्षी व्याकूळ होतात. त्यामुळे या काळात प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती होऊ नये यासाठी पुणे महानगरपालिकेने शहरातील तुळजाई टेकडी परिसरात कृत्रिम तळी बांधली आहेत.

Advertisement

या तळ्यांत नियमितपणे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. उन्हाळ्यात पाण्याअभावी वन्यप्राण्यांचे हाल होतात. जंगलात पाणी मिळत नसल्याने त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. बऱ्याचदा हे प्राणी मानवी वस्तीत येतात. या प्राण्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. टँकरच्या सहाय्याने ही तळी वेळोवेळी भरली जात असून मुके प्राणी आणि पक्षांना उन्हाळ्यामध्ये पाणी उपलब्ध व्हावं या हेतूने हे काम करण्यात आलं आहे.

Advertisement

पुणे महानगरपालिकेकडून या तळ्यांमध्ये योग्य प्रमाणात पाणीसाठा राहील याची काळजी घेतली जात आहे.  
या काळात जंगलात वन्यप्राण्यांना पाणी उपलब्ध होण्यासाठी वनविभागाकडूनही प्रयत्न केले जातात. यासाठी वनविभागाने जंगलांत पाणवठे तयार केले आहेत. टँकरच्या मदतीने येथे पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे जंगलांतील प्राण्यांना पाणी उपलब्ध होते. यासाठी वनविभागाकडून नियोजन करण्यात येते. तालुका स्तरावरील कार्यालयांना आदेश देण्यात येतात. त्यानुसार जिल्हाभरात या पद्धतीने पाणवठे तयार करण्यात येतात. 

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply