Take a fresh look at your lifestyle.

‘त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी भाजीपाला फेकून केला निषेध; पहा कुठे घडली दुर्दैवी घटना

बीड / औरंगाबाद :

Advertisement

सध्या वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्याचवेळी शेतकऱ्यांना आणि दुग्धोत्पादकांना यामुळे अनेकदा समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशाच कारवाईला वैतागलेल्या शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला फेकून प्रशासनाचा निषेध केला आहे.

Advertisement

बीड जिल्यातील धारूर ययेथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. येथील आठवडी बाजारात सोमवारी (ता.२२ मार्च) नगरपालिकेची घंटा गाडी येताच त्यांनी कारवाईला सुरुवात केली. अगोदर शेतकऱ्यांची पळापळ झाली. मात्र, अखेरीस विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांनी यंत्रणेच्या दट्ट्याला वैतागुन आणलेला भाजीपाला छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात फेकून देत निषेध नोंदवला.

Advertisement

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धारुर शहरातील आठवडी बाजाराविरोधात नगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला जात आहे. नाशवंत शेतमाल आणि भाजीपाला त्यामुळे कुठे आणि कसा विकायचा, याची भ्रांत शेतकऱ्यांना पडली आहे. भाजीपाला पिकवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात यासाठी बी बियाणे शेतात राबराब राबून कष्ट करून रात्रीच्या वेळेस न झोपता भाजीपाल्याला पाणी देत बसावे लागते. तसेच महावितरणचा वीज बिल भरण्यासाठी सतत असलेला तगादा अशा मानसिक ताणात असलेल्या शेतकऱ्यांनी मग प्रशासनाचा निषेध केला आहे.

Advertisement

शेतकऱ्यांचा भाजीपाला विकण्यासाठी कोरोनाचे नियम पाळून अंतर ठेवून विक्रीसाठी योग्य नियोजन प्रशासनाने करावे, जेणेकरून आमचे हाल होणार नाहीत व मालाची नासाडी टळेल, असे मत शेतकऱ्यांनी नोंदवले आहे.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply