Take a fresh look at your lifestyle.

अवकाळीची शक्यता कायम; शेतकऱ्यांनो, अशी घ्या या कालावधीत काळजी

पुणे :

Advertisement

कर्नाटकाची किनारपट्टी ते मराठवाडा, कर्नाटक, दक्षिण मध्य महाराष्ट्र या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. तसेच राजस्थानचा नैऋत्य भाग ते अरबी समुद्राचा ईशान्य भाग, सौराष्ट्र आणि कच्छ भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्यामुळे अवकाळी पावसासाठी हा चांगला कालावधी आहे. यादरम्यान शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Advertisement

स्थितीमुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. परिणामी राज्यात अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. यामुळे जालन्यासह मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस होईल. अवकाळी पावसाचे वातावरण गुरुवारपर्यंत राहणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. 

Advertisement

या कालावधीत पुढील काळजी घ्यावी :

Advertisement
  • शेत किंवा मोकळ्या जागेत असल्यास विजेचा कडकडाट सुरू झाला की सरळ घराकडे जावे
  • वीज पडण्याचा धोका असल्याने मोठ्या झाडाखाली थांबू नका
  • अांबा, वड, चिंच, लिंब, बाभूळ या झाडाखाली थांबू नका
  • लाइट, ट्रान्सफॉर्म या ठिकाणी थांबू नका, अर्थिंग असलेल्या ठिकाणी वीज पडण्याची शक्यता असते
  •  सावधगिरी बाळगा आणि जनावरांपासून दूर राहा
  • शेतकऱ्यांनी साेंगणी झालेल्या गहू, ज्वारीची कणसे झाकून ठेवावीत

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply