Take a fresh look at your lifestyle.

‘म्हणून मुख्यमंत्री ठाकरे कमी बोलतात’; फडणवीस यांच्यावरही पटोलेंनी केला हल्लाबोल..!

मुंबई :

Advertisement

मुंबईतील एकूण घडामोडीवर आतापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलणे टाळले आहे. त्यावरून भाजपने मुख्यामंत्र्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Advertisement

मुंबईत पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले की, मी जर सरकारमध्ये असतो तर परमबीर सिंह यांना निलंबित करून टाकले असते. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके असलेली गाडी आढळल्याच्या प्रकरणातील तपासात काही गंभीर चुका पोलिसांकडून झाल्याने आणि या प्रकरणाची चौकशी निष्पक्ष व्हावी यासाठी परमबीर सिंह यांची पोलीस आयुक्तपदावरून बदली केल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले होते. त्यावर पटोले यांनी थेट निलंबित करण्याची भाषा केली आहे.

Advertisement

फडणवीस यांच्यावर टीका करताना पटोले म्हणाले की, मुख्यमंत्री असताना फडणवीस स्वत: न्यायाधीश झाले होते. त्यांच्या कोणत्याही मंत्र्यांवर आरोप झाल्यानंतर ते क्लीन चीट द्यायचे. त्यावेळी त्यांनी का कोणाचेही राजीनामे घेतले नाही? आरोप होत असतात पण सत्यता समोर येईपर्यंत राजीनामा घेतला जात नसतो. दोषी असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी हीच काँग्रेसची भूमिका असेल.

Advertisement

मुख्यमंत्र्यांनी मौन बाळगल्यासंबंधीच्या मुद्द्यावर पटोले म्हणाले की, मनमोहन सिंग हे कधीच बोलत नव्हते. तेव्हा त्यांच्यावर न बोलणारे पंतप्रधान अशी टीका केली जायची. पण आता बोलका पंतप्रधान भेटल्यानंतर देशाचे काय काय झालेय हे आपणही पाहतोय. फडणवीस मुख्यमंत्री असताना तेच प्रवक्ते होते. उद्धव ठाकरेंचा तो स्वभाव नाही. मुख्यमंत्र्यांनी कधी काय हे विरोधी पक्षनेत्याने सांगावे आणि मुख्यमंत्र्यांनी बोलावे असे नाही. असे धोरण केंद्राने आता नव्याने ठरवले आहे का? प्रत्येकाचा वेगळा स्वभाव असतो. फडणवीस न्यायाधीश आणि प्रवक्त्यांची भूमिका निभावत होते. तो त्यांचा प्रश्न होता. त्यामुळे ठाकरे यांच्या बोलण्यावर त्यांनी अजिबात बोलू नये.

Advertisement

परमबीर सिंह कोणाच्या पे रोलवर होते हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे वाटा भाजपावाले कसा घेतात हे जनतेला माहिती आहे. लसीकरणापासून वंचीत भारतीय, इअतर समस्या आणि देशातील वाढत्या महागाई आदि मुद्द्यांवरुन सामान्य जनतेचे लक्ष हटवण्यासाठी भाजपने अशी व्यूहरचना रचल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply