Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ हत्याकांडात फडणवीसांचा सहभाग; आरोप करीत राष्ट्रवादीने केले घराबाहेर आंदोलन..!

नागपूर :

Advertisement

मुंबई पोलिसांच्या उलटसुलट बातम्यांसह राज्यात गृहखात्यात बदल करण्याच्या भाजपच्या मागणीमुळे सध्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चर्चेत आहेत. त्यांचा इकडे आक्रमक बाणा जोरात असतानाच नागपूर येथे त्यांच्या घरावर राष्ट्रवादीने मोर्चा काढून दाखवला आहे.

Advertisement

होय, राष्ट्रवादीने फडणवीस यांच्यावर एका हत्या प्रकरणात अप्रत्यक्ष सहभागी असल्याचा आरोप केला आहे. व्यवसायाने आर्किटेक्ट असलेल्या एकनाथ निमगडे यांची ६ सप्टेंबर २०१६ ला भररस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्याचे हे प्रकरण आहे. कोट्यवधी रुपयांच्या जमीन वादातून काही अज्ञातांनी सुपारी घेऊन हत्या केल्याचा दावा पोलिसांनी याबाबत केला आहे.

Advertisement

ज्या जमिनीवरून वाद होता ती फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघात आहे. या हत्येमध्ये फडणवीस यांचा अप्रत्यक्ष सहभाग आहे. पोलिसांनी खोलात जाऊन तपास केल्यास सत्य समोर येईल. त्यासाठी हे आंदोलन केल्याची माहिती राष्ट्रवादी कार्यकर्ते वेदप्रकाश आर्य, वर्षा श्यामकुळे, महेंद्र भांगे, शैलेंद्र तिवारी आदींनी केला आहे.

Advertisement

त्यासाठी त्यांनी फडणवीस यांच्या घरावर आंदोलन काढले होते. पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.  निमगडे यांच्या खूनात विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून नागपुरात आंदोलन केल्याने आता याकडेही राज्याचे लक्ष गेले आहे.

Advertisement

 राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी हे आंदोलन करण्यात आले. फडणवीसांच्या नागपुरातील धरपेठ येथील निवासस्थानी हे आंदोलन केल्यावर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply