Take a fresh look at your lifestyle.

धडाम..धूम.. ‘त्यामुळे’ शेअर बाजार कोसळला; पहा कितीचा बसलाय फटका

मुंबई :

राज्यासह देशभरात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. एवढेच काय तर राज्यातील काही जिल्ह्यात लॉकडाऊनही घोषित करण्यात आला आहे. यामुळे पुन्हा लॉकडाऊनच्या भीतीने भारतीय शेअर बाजारातही खळबळ उडाली आहे.

Advertisement

आज बुधवारी गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात प्रचंड विक्री केली. यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल ८७१ अंकांनी कोसळला, तर निफ्टीने २५६ अंकांची घसरण नोंदवली. या घसरणीने गुंतवणूकदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. राज्यात तर करोनाने थैमान घातले आहे. येथे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. राज्यातील अन्य शहरांतही रुग्ण संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे कठोर उपाययोजना राबवण्यात येत आहे. काही जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. मागील वर्षभरातील नुकसानीतून सावरत असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी बाजारातून पैसा काढून घेण्याचा सपाटा लावला असल्याचे शेअर बाजार विश्लेषक सांगतात.

Advertisement

दुपारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६१८ अंकांनी घसरला असून तो ४९४३३ अंकांवर ट्रेंड करत आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १८५ अंकांनी घसरला असून तो १४६२९ अंकावर आहे. आजच्या सत्रात बँका, वित्तसंस्था, एफएमसीजी, आयटी सेवा, ऑटो या क्षेत्रात मोठी घसरण झाली आहे. निफ्टी मंचावर सर्वच ११ क्षेत्रात विक्रीचा दबाव आहे. निफ्टी बँक इंडेक्स, निफ्टी आयटी, निफ्टी मेटल, निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस आदी क्षेत्रीय निर्देशांक १ ते २ टक्क्यांनी घसरले आहेत. निफ्टी स्मॉल कॅप आणि मिडकॅप शेअरमध्ये देखील आज मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे दिसून आले.

Advertisement

आजच्या व्यवसायात लार्जकॅप समभागांवर दबाव दिसून आला. सेन्सेक्समधील 30 चपैकी 28 समभाग लाल चिन्हात बंद झाले आहेत, तर केवळ 2 हिरव्या चिन्हात बंद झाले आहेत. एशियन पेंट्स आणि पॉवरग्रीड काठावर बंद झाले. एम & एम, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, axis बँक, इंडसइंड बँक, आयटीसी, एनटीपीसी, टेक महिंद्रा आणि ओएनजीसी या कंपन्यांचा समावेश आजच्या अव्वल तोट्याच्या यादीत आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply