Take a fresh look at your lifestyle.

म्हणून महाविकास आघाडीत वाढली बिघाडी; ‘त्या’ मुद्द्यावर काँग्रेस दाखवणार आक्रमक बाणा..!

मुंबई :

Advertisement

राज्यातील पोलिसांच्या घडामोडींमुळे सध्या राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका होत आहे. त्याचवेळी सत्तेचा तिसरा भिडू असलेल्या काँग्रेस पक्षाचीही यामुळे हकनाक बदनामी होत असल्याचा मुद्दा आता या पक्षाच्या नेत्यांना खटकत आहे. गृहखात्याचा मुद्दा तातडीने निकाली काढण्यासाठी त्यामुळेच काँग्रेस पक्षाने आक्रमक बाणा दाखवण्याची तयारी केली आहे.

Advertisement

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्या लेटरबाॅम्बमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या शक्यता किंवा किमान खांदेपालट होण्याच्या शक्यता व्यक्त होत आहेत. विरोधी पक्ष असलेल्या भाजपने या मुद्द्यांवर सरकारला घेरले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नसताना गोची झाल्याचे चित्र आहे.

Advertisement

मंगळवारी सायंकाळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या राॅयलस्टोन निवासस्थानी झालेल्या काँग्रेस मंत्र्यांच्या बैठकीत मंत्री व नेत्यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. राज्यातील घडामोडींसंदर्भातला अहवाल पक्षश्रेष्ठींना पाठवण्याचे या बैठकीत ठरले आहे.

Advertisement

तसेच एप्रिलमध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या खांदेपालटात आपल्या पदरात अधिकचे काय पडणार याचीही चिंता पक्षाला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या मंत्र्यांमुळे काँग्रेस पक्षाचीही बदनामी होत असल्याने आता काँग्रेसची आणखी एका उपमुख्यमंत्रिपदाची मागणी लावून धरण्याची तयारी पक्षाच्या नेत्यांनी केली आहे.

Advertisement

बैठकीत चर्चेला आलेले मुद्दे असे :

Advertisement
  1. पक्षाने राष्ट्रवादीसोबत आघाडी करून राज्यात सत्ता स्थापन केली, त्या प्रत्येक वेळी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमुळे आघाडी सरकारची मोठी बदनामी झाली.
  2. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी घनिष्ठ असलेले ज्येष्ठ अधिकारी यांच्यावर प्रशासकीय गैरवर्तुणकीबाबत कठोर कारवाई करण्यात यावी
  3. या अधिकाऱ्यांना सरकारचे भय नाही. परिणामी, सरकारला ते सातत्याने अडचणीत आणत असल्याने कारवाई व्हावी
  4. उपमुख्यमंत्रिपदाची मागणी लावून धरली जावी
  5. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खात्यामध्येही बदल करून हा मुद्दा शांत करण्यात यावा

संपादन : सचिन पाटील  

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply