Take a fresh look at your lifestyle.

म्हणून भारत-चीनमध्ये अविश्वासाचे वातावरण, पहा नेमके काय म्हटलेय अमेरिकेने

वॉशिंग्टन :

आशिया खंडातील दोन मोठे देश असलेल्या भारत आणि चीनमध्ये सध्या तणाव आहे. या दोन्ही देशात आजमितीस अविश्वासाचे वातावरण शिगेला पोहोचले आहे. चीनची फसव्या कृती आणि हिंद महासागर प्रदेशातील पारदर्शकतेच्या अभावामुळे संपूर्ण प्रदेशातील स्थिरता आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे. या कारणास्तव यूएस लष्कराच्या इंडो पॅसेफिक कमांडचे नवे प्रमुख बनणार असलेले अॅडमिरल जॉन सी. एक्यूलिनो यांनी अमेरिकन कॉंग्रेसला चीनला घेरण्यासाठी खास रणनीती आखण्याची विनंती केली आहे.

Advertisement

अ‍ॅडमिरल एक्यूलिनो यांनीही चीनशी सुरू असलेल्या तणावाच्या काळात आपली उत्तरेची सीमा सुरक्षित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांचे कौतुक केले. भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण संबंध सर्वोत्कृष्ट असल्याचा दावा त्यांनी केला. भारत आणि चीन यांच्यात अविश्वासाचे वातावरण शिगेला आहे. वास्तविक नियंत्रण रेषेत (एलएसी) चकमकीमुळे द्विपक्षीय संबंध बिघडू लागले आहेत, आणि ‘वन बेल्ट वन रोड’ उपक्रमांतर्गत चीनच्या कारवायांवर भारत अत्यंत संशयी आहे.

Advertisement

खासदारांच्या लेखी प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की, पाकिस्तानमधील ग्वादर आणि श्रीलंकेतील हंबनटोटा येथे चीनची भूमिका देखील भारतासाठी चिंताजनक आहे. हिंद महासागरातील चीनच्या फसव्या कृती आणि पारदर्शकतेचा अभाव यामुळे तेथील स्थिरता आणि सुरक्षेस धोका निर्माण झाला आहे. अ‍ॅडमिरल यांनी नमूद केले की, अमेरिका आणि भारत यांच्यातील लष्करी संबंध आतापर्यंत सर्वोत्कृष्ट आहेत. आणि अमेरिका स्तरीय पातळीवर द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सहकार्य, संयुक्त ऑपरेशन आणि सहकार्याच्या बाबींमध्ये सातत्याने वाढ करीत आहे.

Advertisement

दरम्यान, भारत आणि चीनमध्ये तणाव असल्याने या काळात भारत आणि अमेरिका या दोन देशांचे सहकार्य वाढले आहे. आणि नेमकी हीच गोष्ट चीनला खटकत आहे. चीनची कारस्थाने आता भारताला पूर्णपणे कळाली आहेत. त्यामुळे भारत आता आधिक सावध आहे. चीनच्या प्रत्येक हालचालींवर भारताची बारीक नजर असते.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply