Take a fresh look at your lifestyle.

उन्हाळा आलाय.. उष्माघात टाळण्यासाठी अशी घ्या काळजी; नक्कीच वाचा ही खास माहिती

उन्हाळा आला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात उष्माघात होण्याची शक्यता वाढत आहे. यंदाचा उन्हाळा त्यातही जास्त कडक असण्याची चिन्हे असल्याने सर्वांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी ही महत्वाची माहिती वाचा आणि त्याची अमलबजावणी करा.

Advertisement

शरीरातील पाण्याची पातळी योग्य राहणे उन्हाळ्यात आवशक असते. आपण पाणी नाही पिला, तर शरीरातील पाणी पातळी झपाट्याने कमी  होते व उष्माघाताचा फटका मोठ्या प्रमाणात बसू शकतो. याबाबत काळजी घ्या नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील.

Advertisement

त्यासाठी काही खालील उपाय करा किंवा काळजी घ्या :

Advertisement

योग्य प्रमाणात पाणी पिण्याबरोबर नियमित  प्राणायाम करा. त्यामुळे शरीरातील अनावश्यक उष्णता बाहेर निघून जाईल व उष्णतेचा त्रास कमीत कमी होईल. शरीराचे तापमान स्थीर राहण्यासाठी जास्तीत जास्त अनुलोम विलोम करणे गरजेचे असते. शरीरात गारवा निर्माण होण्यासाठी उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तीत जास्त वेळ चालू ठेवा. त्यासाठी शकतो झोपताना उजव्या कुशीवर जास्त झोपा. त्यामुळे डावी नाकपुडी जास्त वेळ चालू राहील.

Advertisement

सकाळच्या आणि दुपारच्या जेवणानंतर थोडा वेळ झोपा. यामुळे पचनास मदत होत असते. शक्यतो हलका आहार घ्या. पोट साफ ठेवा. पित्त वाढणार नाही याची काळजी घ्या. याबरोबर फ्रीजमधले पाणी पिऊ नका. शक्यतो माठांतील अथवा कोमात पाणी शांत बसून चवीने सावकाश प्या. घटा घटा पाणी पिऊ नये. शक्यतो पाण्यामध्ये बर्फ वापरू नका. कारण बर्फ हा गरम असतो.

Advertisement

शरीर थंड ठेवण्यासाठी आवळा, कोमम, लिंबू, मठ्ठा या प्रकारचे शरबत व थंड पेय नक्की प्या. सकाळी उठल्यावर १ ते २ ग्लास कोमट पाणी सावकाश प्या. कोणतेही काम करताना उन्हामध्ये घाई करू नका. सावकाश काम करा. उन्हाळ्यात जेवण करताना एक दोन घोट पाणी प्यावे. उन्हातून आल्यावर गुळ पाणी प्यावे. खाडी साखर थोडीथोडी खावी. त्यामुळे शरीराचे तापमान मेंटन राहते.

Advertisement

जिरेपूड १ चमचा + खडीसाखर १ चमचा व १ ग्लास  ताकातून  रोज पिणे हितकारक आहे. यामुळे उष्णता  वाढणार  नाही. दुपारच्या  जेवणात  रोज  पांढरा  कांदा  जरूर  खाणे. रात्री  झोपण्यापूर्वी  खोबरेल  तेल  तळपायांना  चोळणे  व  बेंबीत  घालणे. तसेच  देशी  गाईचे  तुप  नाकात  लावणे.

Advertisement

याच बरोबर उन्हापासून शरीराचे रक्षण करा. कॅप, छत्री, गॉगल वापरा. नियमितपणे पाणी प्या. आवडीने आजार पळवा आणि सवडीने उन्हाळ्यात तब्येत सांभाळा आणि उष्माघातापासून संरक्षण करा.

Advertisement

संपादन : सुनील झगडे  

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply