Take a fresh look at your lifestyle.

ठाकरे सरकारने केली शेतकऱ्यांशी गद्दारी; पहा कोणत्या मुद्द्यावर भाजप झालाय आक्रमक

मुंबई :

Advertisement

सततचा दुष्काळ, अतिवृष्टी, बोंडअळी, किड आणि आता झालेली गारपीट यामुळे त्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांना एका रुपयाचीसुद्धा मदत न करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने वाईन उत्पादकांवर मात्र प्रोत्साहनाच्या नावाखाली तब्बल चाळीस कोटी रुपयांची उधळण केली आहे. त्यामुळे वाईन उत्पादकांच्या बाबतीत उदार, पण शेतकऱ्यांच्या बाबतीत गद्दार’  असे हे ठाकरे सरकार असल्याची अशी टीका मुंबई भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

Advertisement

त्यांनी म्हटले आहे की, कोरोनामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्याचे कारण पुढे करून मागील वर्षभरात शेतकऱ्यांना व शेती संलग्न व्यवसायांना एका नव्या रुपयाची सुद्धा मदत ठाकरे सरकारने केली नाही. त्याचवेळी अर्थपूर्ण संवाद साधत काही विशिष्ट लोकांची मर्जी सांभाळण्याचे काम केले आहे. कोरोनामुळे अगोदरच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर मागील वर्षी मे, जून व जुलै या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व खराब बियाण्यांमुळे दुबार-तिबार पेरणी करण्याची वेळ आली.  त्यानंतर अचानक काही भागात पाऊस न पडल्यामुळे कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागले. त्यावेळी सरकारने अजिबात मदत केली नाही.

Advertisement

कापसावर आलेली बोंडअळी, तुरीला लागलेली कीड, कांदा व द्राक्ष उत्पादकांना सहन करावा लागलेला प्रचंड आर्थिक तोटा याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. शेतकरी कसेबसे पुन्हा शेती उभी करून चार पैसे मिळतील या आशेवर असतानाच मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांवर प्रचंड आर्थिक संकट ओढावले. दुर्दैवाने मागील पंधरा महिन्यांच्या काळात साडेचार हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्याकडेही पाहायला राज्य सरकारला अजिबात वेळ नाही.

Advertisement

अशा परिस्थितीत ठाकरे सरकारकडून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची आवश्यकता होती. परंतु प्रत्येक वेळी सरकारकडे पैसे नसल्याचे कारण पुढे करण्यात आले. भाजपने याबाबत विधानसभेच्या सभाग्रहात व सभाग्रहाच्या बाहेर आवाज उठवला. यासाठी अनेकवेळा आंदोलन करण्यात आले. परंतु याची कोणतीही तमा न बाळगता ठाकरे सरकारने दारू विक्रेत्यांच्या वार्षिक फी व करात सवलत दिली आहे. आता तर दारू व वाईन उत्पादनातून करोडो रुपये कमावणाऱ्या वाईन उत्पादकांना 2017 पासूनची प्रोत्साहनपर थकबाकी म्हणून चाळीस कोटी रुपयांची मदत केली आहे. यातून या सरकारची शेतकऱ्यांप्रतीची मानसिकता लक्षात येते. त्यामुळे आगामी काळात ठाकरे सरकारला याची किंमत नक्कीच मोजावी लागेल, असा इशारा सुद्धा आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply