Take a fresh look at your lifestyle.

मस्तच.. आता ‘या’ वाहनांनाही ‘अच्छे दिन’; ६६ टक्के ग्राहकांची पसंती..!


मुंबई :

Advertisement

आजच्या वेगवान जमान्यात वाहनांशिवाय पर्याय राहिलेला नाही. कोणतेही काम असू द्या वाहनाशिवाय सारेच काही अडून बसते. इतका वाहनांचा वापर वाढला आहे. रोज हजारोंच्या संख्येने नवीन वाहने रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे वाहनांच्या क्षेत्रातही नवनवीन संशोधन होत आहे. पेट्रोल व डिझेलच्या वाहनांना पर्याय म्हणून इलेक्ट्रीक वाहनेही रस्त्यावर दिसू लागली आहेत. विशेष म्हणजे, ही वाहने खरेदी करण्याकडेही नागरिकांचा कल वाढला आहे. वाढत्या संख्येने भारतीय ग्राहक इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यास तयार असल्याचे कारदेखो ओएमजी सर्वेक्षणानुसार दिसून आले आहे.

Advertisement

ओम्निकॉम मीडिया ग्रुप या आघाडीच्या जागतिक जाहिरात आणि मार्केटींग कंपनीच्या सहकार्याने इलेक्ट्रिक व्हेइकल कस्टमर अवेयरनेस स्टडीचे प्रकाशन केले. सध्या विकल्या गेलेल्या एकूण वाहनांपैकी १ टक्के पेक्षा कमी इलेक्ट्रीक वाहनांचे योगदान आहे, परंतु काही वर्षांत ते ५ टक्के पर्यंत वाढण्याची क्षमता आहे. २०१९-२० मध्ये भारतात सुमारे ३.८ टक्के लाख इलेक्ट्रिक वाहने विकली गेली होती. त्यापैकी ५८ टक्के कमी-वेगवान ई ३ डब्ल्यू आणि ४० टक्के ई २ डब्ल्यू होते.

Advertisement

सर्वेक्षणानुसार ६६ टक्के ग्राहक इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यास इच्छुक आहेत, त्यापैकी ५३ टक्के लोकांनी इलेक्ट्रिक वाहनासाठी जोरदार कल असल्याचे सांगितले. सर्वेक्षण केलेल्यांपैकी १३ टक्के अजूनही परिवर्तनासाठी तयार नाहीत तर १९ टक्के लोकांनी कोणत्याही मार्गाने जाण्यास नकार दिला. ६८ टक्के ग्राहकांनी पर्यावरणाविषयी आपली चिंता दर्शविली आणि विश्वास ठेवला की ईव्हीजकडे वळल्याने वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. सर्वेक्षण केलेल्यांपैकी जवळपास १२ टक्के लोक म्हणाले की किंमती ठरवणे महत्त्वाचे आहे.

Advertisement

दरम्यान, सध्या इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. तसेच या वाहनांमुळे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे या वाहनांना पर्याय म्हणून इलेक्ट्रीक वाहनांकडे पाहिले जात आहे. तसेच केंद्र सरकारनेही याबाबत धोरण तयार केले आहे.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply