सोलापूर :
उस्मानाबाद, सोलापूर आणि मराठवाड्यातील अनेक जिल्हे बेस्ट ज्वारी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, आता परंपरागत पद्धतीने केल्या जाणाऱ्या ज्वारी शेतीमध्ये उत्पादकांची अडचण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांपुढे हतबल व्हावे लागत आहे.
ही समस्या आहे मजुरांची. मोठ्या कष्टाने फुलवलेल्या शेतीला पाणी देणे आणि इतर व्यवस्थापन खर्च हे आव्हान असतानाच आता मजुरांची टंचाई हा मोठा प्रश्न आहे. गावोगावी तरुण शिकल्याने शेतीमध्ये कामाला जाण्यास बहुसंख्य अनुस्तुक असतात. अगदी आपल्याच शेतात काम करण्यासही या शिकलेल्या तरुणांना कमीपणा वाटत असल्याने पालकांना मजुरांच्या टंचाईची समस्या भेडसावत आहे.
ज्वारीसह गहू, हरभरा काढण्यासाठी मजूर मिळत नसल्याने कामे खोळंबली आहेत. परिणामी उत्पादनात यामुळे घट होत आहे. वेळेवर पिकाची काढणी न झाल्याने होणारे हे नुकसान हा मोठा मुद्दा बनत आहे.
सध्या ज्वारी काढणीला आलेल्या महिला व पुरुष जोडीला ७०० रुपये हजेरी रक्कम द्यावी लागत आहे. शहरातून मजूर आणते वेळी मुकादमास ज्यादा हजेरी द्यावी लागत आहे. त्याचाही भुर्दंड आता शेतकऱ्यांना पडत आहे.
सोलापूर जिल्ह्यात सध्या बऱ्याच ठिकाणी रात्रीची ज्वारी काढली जात आहे. यासाठी बाहेरुन मजूर आणले जात असून हे मजूर सायंकाळी सहा ते रात्री १० पर्यंत काम करतात. यासाठी त्यांना ३५० रुपये हजेरी द्यावी लागत आहे.
काही ठिकाणी काढणीसाठी शेकडा ८०० रुपये दर द्यावा लागत आहे. हे परवडत नसतानाही मजुरांअभावी नाईलाज असल्याने उत्पादकांना हे पैसे द्यावेच लागत असल्याचे विदारक चित्र आहे.
संपादन : संतोष वाघ
कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.
- मोदी सरकारने घेतले ‘ते’ महत्वाचे निर्णय; करणार ऑक्सिजन व रुग्णांच्या सोयीसाठीची तरतूद
- महाराष्ट्रात सुरू आहे ‘अशी ही पळवापळवी..’; सोमय्यांनी वेधले ‘त्या’ मुद्द्याकडे लक्ष
- आणि म्हणून पाकिस्तानने घातली फेसबुक, युट्युब, ट्विटर, व्हाटस्अपवरही बंदी; पहा नेमका काय घेतलाय निर्णय
- ‘त्या’ महत्वाच्या समिती स्थापनेलाच कोलदांडा; सरपंच उदासीन, तर राज्य सरकारही निरुत्साही..!
- म्हणून शेअर बाजारात तेजी; पहा सेन्सेक्स, निफ्टीची काय स्थिती