Take a fresh look at your lifestyle.

म्हणून शुक्रवारी भारत बंद; मोदी सरकारच्या विरोधात पुकारला ‘त्यांनी’ एल्गार..!

सोलापूर :

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या शेती आणि आर्थिक धोरणाच्या विरोधात शेतकरी, कामगार आणि कष्टकऱ्यांसह नोकरदारांनी एल्गार पुकारला आहे. त्यासाठी शुक्रवारी (दि. २६) भारत बंदची हाक देण्यात आल्याची माहिती सीटूचे ज्येष्ठ नेते नरसय्या अाडम यांनी दिली आहे.

Advertisement

दिल्लीतल्या शेतकरी अांदाेलनाला चार महिने झाल्याचे अाैचित्य साधून
सार्वजनिक उद्याेगधंद्यांचे खासगीकरण, इंधन दरवाढ, नवीन कृषी कायदे अाणि कामगार कायद्यांतील शिथिलीकरण या धाेरणांना विराेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आलेला आहे. भारतीय मजदूर संघ वगळून देशातल्या सर्व संघटना त्यासाठी एकत्र अाल्या आहेत.

Advertisement

माकप कार्यालयात पत्रकार परिषदेत अाडम यांनी सांगितले की, कृषी कायद्यातील सुधारणांना विराेध करत हजाराे शेतकऱ्यांच्या अांदाेलनाला चार महिने पूर्ण हाेत अाहेत. या अांदाेलनात अातापर्यंत ३०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. परंतु केंद्र सरकार असंवेदनशील झाले. उलट शेतकऱ्यांना भाजपने थेट दहशतवादी ठरवले असल्याने या आंदोलनात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Advertisement

अॅड. रा. गाे. म्हेत्रस, जनता दलाचे चन्नप्पा सावळगी, माकपचे जिल्हा सचिव अॅड. एम. एच. शेख, माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी, सिद्धप्पा कलशेट्टी यांनी म्हटले आहे की, शभरातील श्रमजीवी घटकांमध्ये केंद्राच्या विराेधात प्रचंड असंताेष निर्माण झाला. त्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी देशभरातल्या संघटना एकवटल्या. राज्यातील महाविकास अाघाडीदेखील त्यात सहभागी होणार आहेत.

Advertisement

तीन कृषी कायदे शेतकऱ्यांनाच संपवणारे आहेत. कॉर्पोरेट व्यक्तींच्या दबावाखाली हे कायदे संमत झाले. त्याच्या विरोधात शेतकरी आहेत. केंद्राने कामाचे ८ तास आता १२ तास झाले. याचाच अर्थ कामगारांना पुन्हा गुलामगिरीत नेण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. तसेच इंधन दरवाढ आणि बँका व विमा संस्थांचे खासगीकरण याच्या विरोधात भारत बंद करण्यात येत असल्याचे अाडम यांनी सांगितले आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply