Take a fresh look at your lifestyle.

लॉकडाऊन अपडेट : म्हणून महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हाही केलाय लॉक..!

बीड / औरंगाबाद :

Advertisement

राज्यात करोनाचा फैलाव वेगाने होत असल्याने राज्य सरकार आता कठोर निर्णय घेत आहे. त्यामुळे आता नगर जवळील बीड जिल्ह्यात कडकडीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. २६ मार्चपासून ४ एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन राहणार आहे. मागील वर्षात मार्च महिन्यातच लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर आज एक वर्षानंतर पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल होत आहे.

Advertisement

देशात करोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. राज्यात तर या आजाराने थैमान घातले आहे. नवीन वर्षात तरी आजार आटोक्यात येईल असे अपेक्षित होते. मात्र, ही अपेक्षा फोल ठरली आहे. या वर्षात जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात रुग्ण संख्या कमी होती. मात्र मार्च महिन्यात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरू केली आहे.

Advertisement

नगर जवळ असणाऱ्या बीड जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद राहणार आहेत.सर्व खासगी कार्यालय, मंगल कार्यालय, हॉटेल बंद राहणार आहेत. तसंच, अत्यावश्यक सेवेनुसार किराणा दुकान, दुध विक्री आणि मेडिकल दुकाने सुरु राहणात आहेत.

Advertisement

लॉकडाऊन करुन करोनास अटकाव करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे. या आजारास प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना राबवल्या जात आहेतच. करोना प्रतिबंधक लसीकरणास वेग देण्याच्या उद्देशाने आता देशातील ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे लसीकरणास गती मिळणार आहे. याच बरोबर नागरिकांनी देखील काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply