Take a fresh look at your lifestyle.

म्हणून झेंडूची शेती आहे खूप किफायतशीर; जाणून घ्या याचे नेमके महत्व


पुणे :

Advertisement

आपल्या देशात बहुतेक सण, उत्सव मंगलकार्यात झेंडूच्या फुलांची हजेरी असते. नवरात्र आणि दसऱ्यात झेंडूच्या फुलांना सर्वाधिक मागणी असते. झेंडूचे पीक विविध प्रकारच्या जमिनीत विविध प्रकारच्या हवामानात उत्तम प्रकारे घेता येते. तसेच झेंडूची शेती किफायतशीर सुद्धा आहे. त्यामुळे याबाबत आधिक माहिती जाणून घेऊ या…

Advertisement

राज्यात सणासुदीच्या काळात झेंडूच्या फुलांना प्रचंड मागणी असते. झेंडूच्या फुलांचे विविध रंग व आकार असतात. काढणीनंतर फुले चांगल्या प्रकारे टिकत असल्याने या फुलांना भाव देखील चांगला मिळतो. झेंडूचे पीक हे हलक्या जमिनीत आणि कमी पाण्यात येते. लागवडीपूर्व जमिनीची २ ते ३ वेळा खोलवर नांगरट, २ ते ३ वेळा फणणी करून धसकटे व हरळीच्या काशा वेचून जमीन स्वच्छ व भुसभुशीत करावी.

Advertisement

त्यानंतर हेक्टरी २५ ते ३० टन चांगले कुजलेले शेणखत मिसळून ५० किलो नत्र, २०० किलो. स्फुरद व २०० किलो पालाश लागवडीपूर्वीच जमीनीच पूर्णपणे मिसळून घ्यावे. व नंतर ६० से. मी. अंतरावर सरी वरंबे तयार करून घ्यावेत व त्यानंतर सर्यासची नाके तोडून पाणी पुरावठ्याच्या सोयीप्रमाणे वाफे करून घ्यावेत. झेंडूची लागवड करताना ६० से. मी. अंतरावर घेतलेल्या सरीच्या मध्यभागी ३० से. मी. इतके दोन रोपांमधील अंतर ठेवून लागवड करावी. ६० X ३० से. मी. अंतरावर लागवड केल्यास हेक्टरी ४० हजार रोपे लागतात.

Advertisement

लागवड करतांना भरपूर पाण्यामध्ये व सायंकाळी ४ नंतर लागवड करावी. म्हणजे रोपांची मर होत नाही. लागवडीनंतर १५ दिवसांनी पहिली खुरपणी करावी. त्यावेळी नत्र खताचा दुसरा हप्ता ५० किलो प्रति हेक्टर याप्रमाणात द्यावा. आफ्रिकन आणि फ्रेंच जातींसाठी शेणखत २५ ते ३० मे. टन प्रति हेक्टर याप्रमाणे तसेच १०० किलो नत्र, २०० किलो स्फुरद व २०० किलो पालाश याप्रमाणे खते दयावी. संकरीत जातींची लागवड करायची असल्यास प्रति हेक्टर नत्र २५० किलो, स्फुरद ४०० किलो याप्रमाणे लागवडीपूर्वीच जमिनीत पूर्णपणे मिसळून खते द्यावीत.

Advertisement

हंगाम झेंडूचे पीक घेतले असल्यास पावसाचा ताण पडल्यास १-२ वेळा १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. हिवाळी हंगामातील पिकासाठी ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे व उन्हाळी हंगामासाठी ५ ते ७ दिवसांनी पाणी द्यावे. कळ्या लागल्यापासून फुलांची काढणी होईपर्यंत पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये. झेंडूंच्या फुलांचे हेक्टरी १२ ते १५ टन उत्पादन मिळते. संकरीत जातींची लागवड केल्यास प्रति हेक्टरी १८ ते २० टन उत्पादन मिळते.

(सोर्स कृषी विभाग महाराष्ट्र)

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply