Take a fresh look at your lifestyle.

अरे वा… आता ‘याचेही’ मोबाईलवर मार्गदर्शन; पहा शेतकऱ्यांना काय होणार फायदा

अहमदनगर :

Advertisement

राज्यातील कृषी क्षेत्रासमोर अनेक आव्हाने आहेत. अवकाळी पाऊस, दुष्काळ अशी संकटे आहेतच. त्याच्या जोडीला पिकांवर पडणारे किड रोग हे सुद्धा एक मोठे संकट आहे. या संकटामुळे हजारो हेक्टरवरील पिके अक्षरशः नष्ट होतात. किड रोगांबाबत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने या रोगांना अटकाव करणे शक्य होत नाही.

Advertisement

ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने क्रॉपसॅप (कीड रोग सर्वेक्षण व मार्गदर्शन) प्रकल्प राज्यात सुरू केला आहे. या प्रकल्पात यंदा काजू, भेंडी आणि टोमॅटो या तीन पिकांचे नव्याने समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता या तीनही पिकांबाबच योग्य मार्गदर्शन मिळणार आहे.

Advertisement

 राज्यात हवामानाच्या लहरीपणामुळे कीड रोगांचा प्रादुर्भाव होतो. कीड रोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट होते, हा अनुभव अधूनमधून येतो. सन २००८-०९ मध्ये अशाच प्रकारे राज्याच्या मराठवाडा व विदर्भ विभागात अचानक उद्‌भवलेल्या किडींच्या उद्रेकामुळे सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. ही आपत्ती कृषी विभागाने आव्हान म्हणून स्वीकारली. अशी परिस्थिती पुन्हा उद्‌भवू नये या हेतूने, केंद्र सरकारच्या विविध अग्रगण्य संशोधन संस्था, राज्यातील कृषी विद्यापीठे व कृषी विभाग यांचा समन्वय करण्यात आला.

Advertisement

त्या दृष्टीने राज्यात २००९-१० मध्ये राष्ट्रीय कृषी विभाग योजनेंतर्गत ‘क्रॉपसॅप’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला. याद्वारे किड- रोगांच्या सद्यःस्थितीवर आधारित शास्त्रोक्त मार्गदर्शन शेतकऱ्यांना एसएमएसद्वारा देण्यात येऊ लागले. त्यामुळे पिकांचे किडी-रोगांपासून संरक्षण होण्यास मदत झाली.

Advertisement

या प्रकल्पात आतापर्यंत सोयाबीन, कापूस, भात, तूर, हरभरा, मका, ज्वारी, ऊस, आंबा, डाळींब, केळी, मोसंबी, संत्रा, चिकू या पिकांचा समावेश आहे. यामध्ये आता काजू, भेंडी व टोमॅटो या पिकांची भर पडली आहे. राज्यात या तीनही पिकांचे उत्पादन चांगले होते. त्यामुळे या पिकांबाबत योग्य मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रकल्पात या पिकांचा समावेश करण्यात आला आहे.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply