Take a fresh look at your lifestyle.

गाळमुक्त धरणासाठी ‘असे’ झालेय नियोजन; पहा काय केले जाणार यामध्ये

अहमदनगर :

Advertisement

जिल्ह्यातील १०० जलस्रोतांमधील गाळ काढून त्यांना गाळमुक्त धरण करण्याचे नियोजन अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे. त्यासाठी 1 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे.

Advertisement

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी याबाबत सांगितले की, १६ ते २२ मार्च या कालावधीत राबविलेल्या जलजागृती कार्यक्रमांचे आयोजन केले होते. जलसाक्षरता चळवळ आणि शासकिय इमारतीवरील रेनवॉटर हार्वेस्टिंगकडे होत असलेले दुर्लक्ष याकडे लक्ष वेधले.

Advertisement

माझी वसुंधरा हा नवीन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. नवीन बांधकाम होणाऱ्या घरांसाठी-इमारतींसाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग करणे सक्तीचे आहे. जुन्या इमारतींवर जिथे जिथे शक्य आहे, तिथे तिथे नावीन्यपूर्ण योजनेतून रेनवॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसवण्यासाठी लक्ष दिले जाईल, असे भोसले यांनी सांगितले आहे.

Advertisement

१०० जलस्रोतांमधील गाळ काढून त्यांना गाळमुक्त धरण करण्याचे नियोजन असून त्यासाठी एक कोटी रुपयाची तरतूद केली आहे. जलयुक्त शिवार, पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून या जिल्ह्यात यापूर्वी लोकसहभागातून कामे होत आहेत. पाणी संरक्षण-संवर्धन करणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply