Take a fresh look at your lifestyle.

म्हणून खरेदीला आले ‘सोन्याचे दिवस’; पहा काय राहणार आहे मार्केट स्थिती

मुंबई :

Advertisement

देशभरात सर्वांनाच खूप आवडत असलेल्या सोने या धातू आणि दागिन्यांची किंमत आता कमी झालेली आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी सोने खरेदीची ही पर्वणी साधण्यास सुरुवात केली आहे. भाव घटल्याने भारत देशासह मलेशिया, दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये साेन्याची मागणी वाढत असल्याचे रिपोर्ट आहेत.

Advertisement

सोन्याची किंमत नऊ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर म्हणजे ४४ ते ४७ हजार प्रति दहा ग्रॅमच्या रेंजमध्ये असल्यास खरेदी अशीच वाढती राहण्याचा अंदाज आहे. सोने ५६,००० रुपये प्रति ग्रॅमच्या उच्च पातळीवर पोहोचले होते. त्यामुळे कधीतरी पुन्हा आकडा हा धातू पार करणार आहेच. तोपर्यंत  किफायतशीर भावात खरेदीची ही संधी असल्याचे सुरेंद्र मेहता (राष्ट्रीय सरचिटणीस, आयबीजेए) यांना वाटत आहे.

Advertisement

सोन्याच्या बाजाराचे मुद्दे असे :

Advertisement
  • फेब्रुवारी २०२१ मध्ये भारतात सोन्याची खरेदी २०१९ नंतर सर्वोच्च पातळीवर पोहोचली
  • भारत, मलेशिया, दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये साेन्याची मागणी वाढत आहे
  • ग्राहकांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी रिटेलर्सही मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करत आहेत
  • लग्नसराई सुरू होत असल्याने ग्राहक घटलेल्या किमतीवर जास्तीत जास्त खरेदी करू इच्छित आहेत
  • आयात शुल्कातील घटीमुळे देशात साेने आणखी स्वस्त
  • आयात शुल्कातील घटीमुळे देशात साेने आणखी स्वस्त
  • दक्षिण कोरियात किरकोळ गुंतवणूकदारही स्वस्त सोने जमा करण्यात गुंतले
  • २०२१ मध्ये चीनमध्ये सोन्याच्या दागिन्याचा खर्च २८ टक्के वाढण्याची शक्यता

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply