Take a fresh look at your lifestyle.

वाव.. खुला होणार फ्लेक्स फ्युअलचा पर्याय; मग कमी किमतीतही मिळणार पेट्रोल..!

पुणे :

Advertisement

सध्या देशभरात पेट्रोल आणि डीझेल यांच्या  भाववाढीने कहर केला आहे. जागतिक बाजाराचा कच्च्या तेलाचे भाव कमी असूनही केंद्र व राज्य सरकारच्या अफाट करांमुळे इंधनाचे भाव भडकलेले आहेत. अशावेळी केंद्र सरकार एक नवीन उपक्रम घेऊन येत आहे. ज्यामुळे ग्राहकांना इंधनाचा पर्याय खुला होऊन कमी किमतीत पेट्रोल मिळण्याची संधी खुली होणार आहे.

Advertisement

हा पर्याय आहे फ्लेक्स फ्युअलचा अर्थात फ्लेक्सिबल फ्यूल व्हेईकलच्या(एफएफव्ही) याचा. होय, यामध्ये पेट्रोल आणि इथेनॉल यांचा ब्लेंडेड आणि अनब्लेंडेड पेट्रोल वापरण्याचा पर्याय ग्राहकांना खुला असेल.  गाड्यांमध्ये जीवाश्म इंधनाचा वापर वाढवण्यासाठी सरकार फ्लेक्सिबल फ्यूल व्हेईकलच्या(एफएफव्ही) दिशेने गांभीर्यपूर्वक विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Advertisement

एफएफव्ही वाहन हे एक मॉडिफाइड व्हर्जन असेल. ज्यामध्ये पेट्रोल आणि इथेनॉल यांचा ब्लेंडेड आणि अनब्लेंडेड पेट्रोल किती आणि कसे वापरायचे हे ग्राहक ठरवतील. वेगवेगळे इथेनॉल मिळून पेट्रोलवर चालवले जाऊ शकणारी वाहने यात असतील. देशात सध्या पेट्रोलमध्ये १० टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिसळण्यास परवानगी आहे.

Advertisement

त्यातच बीएस ६ मानकांमुळे वाहनांचा खर्च वाढला आहे. अशावेळी २० टक्के ब्लेंडिंगपर्यंत जास्त बदल होणार नाही. मात्र, एफएफव्ही स्वीकारल्याने इंजिनात बराच बदल करावा लागेल. त्यामुळे कार आणि वाहनांच्या किमतीत वाढ होऊ शकते. त्याचे नेमके काय धोरण असेल हे समजू शकलेले नाही.

Advertisement

पेट्रोलियम सचिव तरुण कपूर यांच्या म्हणण्यानुसार, गाड्यांमध्ये जीवाश्म इंधनाचा वापर वाढवण्यासाठी सरकार फ्लेक्सिबल फ्यूल व्हेईकलच्या(एफएफव्ही) दिशेने गांभीर्यपूर्वक विचार चालू आहे. यामुळे लोकांना दर आणि सुविधेच्या आधारावर इंधन बदलण्याचा(पेट्रोल आणि इथेनॉल) पर्याय मिळतो. याचा  वाहनाचा ब्राझीलमध्ये यशस्वीरीत्या वापर चालू आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply