Take a fresh look at your lifestyle.

तब्बल तीन आठवड्यांनंतर दिलासा; पहा किती कमी झालेत इंधनाचे भाव..!

पुणे :

Advertisement

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असल्याने आज देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी नागरिकांना काहीसा दिलासा दिला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाच्या दरात कपात केली आहे. आज देशात पेट्रोल १८ पैसे आणि डिझेलचे दर १७ पैशांनी कमी झाले आहेत.

Advertisement

आजच्या दर कपातीने मुंबईत पेट्रोलचा भाव ९७.४० रुपये झाला आहे. तर डिझेलचा भाव ८८.४२ रुपये झाला आहे. त्याआधी सलग २४ दिवस मुंबईत पेट्रोल ९७.५७ रुपयांवर आणि डिझेल ८८.६० रुपये होते. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.९९ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ८१.३० रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.९५ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८६.२९ रुपये भाव आहे. कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९१.१८ रुपये आहे. डिझेलचा भाव ८४.१८ रुपये झाला आहे. बंगळुरात पेट्रोल ९४.०४ रुपये असून डिझेल ८६.२१ रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८९.५८ रुपयांचा विक्रमी दर आहे.

Advertisement

पेट्रोल आणि डिझेलवर राज्य आणि केंद्र सरकारकडून कर आकारले जातात. त्यामुळे ग्राहकांना जास्त किंमत मोजावी लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून तर पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांचे बजेट कोलमडले होते. सरकारच्या या दुहेरी कर पद्धतीवर टिका करण्यात येते. मात्र, सरकारच्या धोरणात अद्याप तरी कोणताही बदल झालेला नाही. तीन आठवड्यांनंतर इंधनाचे दर थोडे कमी झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. वस्तू आणि सेवा कर कक्षेत पेट्रोल आणि डिझेलचा समावेश करण्याची मागणी जीएसटी लागू झाल्यापासून होत आहे.

Advertisement

मात्र जीएसटी लागू होऊन चार वर्षे उलटली तरी अद्याप यावर निर्णय झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र आणि राज्य सरकारचा करांचा भार असल्याने ग्राहकांना सध्या उच्चांकी किंमत मोजावी लागत आहे. त्यामुळे दुहेरी कर पद्धतीवर टीका करण्यात येत आहे. दुसरीकडे गेल्या सहा वर्षांच्या काळात सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर तब्बल ३०० टक्क्यांहून आधिक कर लावल्याची माहिती खुद्द केंद्र सरकारनेच दिली आहे.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply