Take a fresh look at your lifestyle.

अरेरे.. म्हणून विदेशावारी पडणार लांबणीवर; पहा नेमका काय घेतलाय निर्णय

मुंबई :

Advertisement

जगभरात करोनाचा फैलाव वेगाने होत असल्याने निर्बंध आधिक कठोर करण्यात येत आहेत. हवाई वाहतूक नियामक संचालनालयाने आंतरराष्ट्रीय विमान सेवेवरील निर्बंध आणखी एक महिना वाढवले आहेत. डीजीसीएने ३० एप्रिलपर्यंत आंतरराष्ट्रीय विमान सेवा खंडीत केली आहे.

Advertisement

गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय विमान सेवेवरील निर्बंध वाढवण्यात आले होते. युरोपात करोनाची दुसरी लाट आल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने आंतरराष्ट्रीय विमान सेवा ३० एप्रिल २०२१ पर्यंत स्थगित केल्यास डीजीसीएने ट्विटमध्ये म्हटले आहे.

Advertisement

निवडक देशांशी द्विपक्षीय करारांतर्गत आंतरराष्टीय विमान सेवा सुरु केली आहे. यात अमेरिका, ब्रिटन, यूएई, केनिया, भूतान, फ्रान्स यासह २७ देशांनी केलेल्या द्विपक्षीय करारानुसार सुरु असलेली विमान सेवा कायम राहील, असेही डीजीसीएने स्पष्ट केले आहे.

Advertisement

केंद्र सरकारने विमान कंपन्यांना आणि विमानतळ हाताळणाऱ्या कंपन्यांना सोशल डिस्टंसिंगचे कडेकोट पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार बोर्डिंगपास काढताना तसेच प्रतिक्षालयातील आसन व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. तसेच विमानात देखील दोन आसनांमध्ये एक आसन रिक्त ठेवण्यात आले आहे. प्रवाशांना करोनापासून संरक्षित करण्यासाठी तोंडावर मास्क, आवरण, हातमौजे अशा प्रकारच्या उपायोजना विमान कंपन्यांनी आणि विमानतळ प्राधिकरणाने दिल्या आहेत.

Advertisement

जगभरात करोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. युरोपातील काही देशांनी पुन्हा लॉकडाऊन केले आहे. अन्य देशांतही स्थिती बिघडत आहे. त्यामुळे या परिस्थितीत विमान सेवेवरील निर्बंध हटवणे शक्य नाही. त्यामुळे हे निर्बंध आणखी एक महिना कायम राहणार आहेत.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply