Take a fresh look at your lifestyle.

म्हणून सोयाबीनने केलाय उच्चांक; पहा नेमका काय झालाय परिणाम, ‘त्यांना’ आलेत अच्छे दिन

पुणे :

Advertisement

मागील फ़क़्त एका वर्षभरात सोयाबीन या तेलबिया पिकाच्या भावात तब्बल 40 टक्के इतकी दमदार वाढ झाली आहे. जागतिकदृष्ट्या बाजारात मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने आणि खाद्यतेलाचे भाव वाढत असल्याने सोयाबीन पिकाचा भाव सध्या उच्चांकी आहे.

Advertisement

सोयाबीनची किमती मंगळवारी आपल्या सर्वकालीन उच्चांक 5,662 रुपये प्रति क्विंटलवर गेली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी आपले पीक याआधीच विकले असल्याने या भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांना नाही, तर व्यापाऱ्यांना दणक्यात झाला आहे. व्यापाऱ्यांना यामुळे खऱ्या अर्थाने अच्छे दिन आल्याची अनुभूती आलेली आहे.

Advertisement

साेयाबीन रिफाइंड तेलाचे भाव 1320 / 10 किलो इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. परिणामी सोयाबीन या शेतमालास अच्छे दिन आलेले आहेत. जागतिक बाजारातील वाढीचा हा सगळा परिणाम आहे.

Advertisement

भाव वाढण्याची नेमकी करणे अशी :

Advertisement
  1. अमेरिकेत जास्त थंडी पडल्याने सोयाबीनची पेरणी उशिराने झाली
  2. इंडोनेशिया आणि मलेशियाने पाम तेलावर निर्यात शुल्क वाढवले 
  3. पेट्रोल-डिझेलचे भाव वाढल्याने मालभाडे वाढले
  4. चीन सलग सोयाबीनची खरेदी करत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या किमती वाढल्या
  5. कोरोनाच्या अटकावासाठी पुन्हा एकदा साठेबाजी वाढली

आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष (कमोडिटी अँड करन्सी रिसर्च) अनुज गुप्ता यांच्या अंदाजानुसार पुढील दोन महिन्यांत अमेरिकेत नव्या पिकाची आवक सुरू होईल, अशा स्थितीत सोयाबीन आणि रिफाइंड तेलात घसरण सुरू होईल. त्याचे परिणाम मग भारतीय बाजारात दिसतील.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply