Take a fresh look at your lifestyle.

डिजिटल करन्सीचे ‘हे’ आहे वास्तव; पहा भारतात नेमके काय चालू आहे याबाबत

डिजिटल करन्सी हा सध्या कोट्यावधी भारतीयांचा परवलीचा शब्द बनला आहे. सध्या भारतात यावर थेट राजरोस व्यवहार होत नसले तरीही सुमारे 1 कोटी भारतीयांनी या क्रिप्टोकरेंसी (cryptocurrency) व्यवहारात किमान 16 हजार कोटी लावले असल्याची शक्यता आहे. त्यावर बंदी घालण्याचा कायदा चर्चेत असतानाच भारत सरकार असे चलन (digital rupee currency) आणण्याची तयारी करत असल्याच्या बातम्या आहेत.

Advertisement

इन्फोसिसचे चेअरमन नंदन निलेकणी यांना वाटते की, भारतात डिजिटल रुपया 2-3 वर्षांत येऊ शकतो. क्रिप्टोकरेंसीच्या वाढत्या क्रेझबाबत ते म्हणतात की, सध्या भारतात त्यासंबंधी करार होण्यास वेळ लागेल. मात्र, भविष्यात गुंतवणूकीसाठी याला परवानगी दिली जाऊ शकते. परंतु, खरेदी आणि व्यवहारासाठी परवानगी देणे कठीण आहे. याचे एक मोठे कारण असे आहे की भारतातील परिस्थिती ही जगातील इतर देशांपेक्षा वेगळी आहे.

Advertisement

नंदन निलेकणी म्हणाले की, ज्या व्यासपीठावर क्रिप्टो चालू आहे ते ब्लॉकचेन आहे. भारतातील बर्‍याच भागात सध्या याचे व्यवहार होतात. परंतु क्रिप्टोचा वापर चलन म्हणून भारतात करणे अवघड आहे. 1968 पर्यंत सोन्याच्या गुंतवणूकीवर भारताने निर्बंध लावले होते. ब्लॉकचेनवर आधारित क्रिप्टो व्यवसाय आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असल्याने भांडवलाच्या हालचालींवर नियंत्रण रद्द करण्याची जुन्या मागणीवरुन भारताचे धोरण जसे आहे तशीच राहील. त्याचे कारण असे आहे की सरकार आर्थिक व्यवस्थेच्या स्थिरतेबद्दल खूप सावध आहे.

Advertisement

चीन डिजिटल युआन आणण्याची तयारी करत आहे. अमेरिका आणि जपानसह आणखी बरेच देश डिजिटल चलन आणण्याचा विचार करत आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक डिजिटल करन्सी आणू शकतेअशाही बातम्या आहेत.

Advertisement

क्रिप्टो चलनात सर्वाधिक लोकप्रिय बिटकॉइन (bitcoin) आहे. सध्या हा बाजार एक ट्रिलियन डॉलर्स झाला आहे. भारतात बिटकॉइनसह अनेक क्रिप्टो चलनांमध्ये सुमारे एक कोटी लोकांनी 10-15 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. एक विभाग क्रिप्टोच्या प्रवृत्तीस नैसर्गिक डिजिटल क्रांती मानतो, तर दुसरा विभाग फॅशन आणि घोटाळा असे त्याचे वर्णन करतो.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply