Take a fresh look at your lifestyle.

धोकादायक धरणांच्या मजबुतीकरणासाठी ६०० कोटी; पहा कोणते १२ धरण आहेत त्यात

पुणे :

Advertisement

राज्यातील १२ धोकादायक धरणांच्या मजबुतीकरणासाठी जागतिक बँक व राज्य शासनाचे सहाय्याने धरण पुनरस्थापना व सुधारणा प्रकल्प राबवण्यात येत आहे. केंद्रीय जल आयोगाकडून शिफारस केल्याप्रमाणे यासाठी ६०० कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Advertisement

निधी मंजूर झालेले धरण प्रकल्प असे :

Advertisement
 • जायकवाडी : ८८ कोटी ५७ लाख
 • भंडारदरा : ७३ कोटी ७९ लाख
 • भातसा : २०० कोटी ६६ लाख
 • डिंभे : ७२ कोटी ९२ लाख
 • वान : १० कोटी ६ लाख
 • ज्ञानगंगा : ५ कोटी ५० लाख‌
 • संपान : १५ कोटी १० लाख
 • कोयना : २२ कोटी ७० लाख
 • कण्हेर : १० कोटी ९१ लाख
 •  अप्पर वर्धा : १० कोटी ४९ लाख
 •  मांजरा : ५० कोटी ६१ लाख
 •  लोअर वेण्णा वडगाव : ५९ कोटी ४४ लाख
 •  एकूण तरतूद : ६०० कोटी ७५ लाख

यामध्ये केली जाणारी कामे अशी :

Advertisement
 • मुख्य दगडी भिंतीतून होणारी पाणी गळती रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना
 • विश्रामगृह, सांडवा भिंत, आधुनिक भूकंपमापन केंद्र हे नवीन डिझाईन पद्धतीनुसार करणे
 • सिमेंट ग्राऊटींग मिक्स डिझाईन करणे, उभी बाजूस शॉर्टकीट करणे, तसेच मूलभूत सुविधाची उभारणी करणे

संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवाल संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात राज्यातील १२ धरणे धोकादायक असल्याचे स्पष्ट करण्यात आल्यानंतर ही महत्वाची कार्यवाही सुरू झाली आहे. असे मोठे प्रकल्प जर धोकादायक ठरले आणि दुर्दैवाने काही अपघात घडला तर त्यामुळे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे यावर वेगाने कार्यवाही सुरू झालेली आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply