Take a fresh look at your lifestyle.

म्हणून पिक व्यवस्थापनात सूक्ष्म सिंचन महत्वाचे; पहा नेमका काय सल्ला दिलाय तज्ञांनी

अहमदनगर :

Advertisement

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापनाचे आधुनिक कृषी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राद्वारे जागतिक जल दिनानिमित्त आयोजीत ऑनलाइन कार्यक्रमात काटेकोर पाणी व्यवस्थापनावर सखोल चर्चा झाली. त्यामध्ये सूक्ष्म सिंचन पिक व्यवस्थापनात कितपत प्रभावी आहे, यावर उहापोह करण्यात आला.

Advertisement

कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांनी म्हटले की, काटेकोर पाणी व्यवस्थापनाकरिता कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर अधिकाधिक होऊन पिकांच्या सिंचनाची कार्यक्षमता वाढवणे गरजेचे आहे. सुक्ष्म सिंचनाचा वापर केल्यास कमी पाण्यात अधिक उत्पादन घेऊन पाण्याची बचत करता येते. 

Advertisement

उस्मानाबाद रांजनी येथील नॅचुरल शुगर आणि पुरक उद्योग कारखान्याचे संचालक कृषिभूषण पांडुरंग आव्हाड, अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, प्रकल्प समन्वयक डॉ. सुनील गोरंटीवार, आंतरविद्या जलसिंचन व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. एम. एस. माने, संशोधन सहयोगी डॉ. मंगल पाटील, प्रकल्प सहसमन्वयक डॉ. मुकुंद शिंदे, संशोधन संचालक डाॅ. शरद गडाख, नेटाफिम इंडियाचे कृषी विद्याप्रमुख अरुण देशमुख आदि यावेळी उपस्थित होते.

Advertisement

नेटाफिमचे देशमुख यांनी सुक्ष्म सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन आणि डिजिटल शेतीच्या वापराने पाणी व्यवस्थापन यावर माहिती दिली. तर, आव्हाड म्हणाले की, पाणी ही नैसर्गिक साधनसंपत्ती असून तिचा काटेकोर वापर करणे गरजेचे आहे. शेतीसाठी पुनर्प्रकिया पाण्याचा वापर करण्यात यावा.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply