Take a fresh look at your lifestyle.

म्हणून उपमुख्यमंत्र्यांनाच दिले आव्हान; मंत्री राऊत यांनी केले थेट घरावरच मोर्चा काढण्याचे आवाहन..!

नाशिक :

Advertisement

दलित-मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणाबाबत काहीच निर्णय घेतला जात नसल्याच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेसचे महत्वाचे नेते आणि ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी याप्रकरणी आपल्याच मंत्रिमंडळात सहकारी असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरावर मोर्चा काढण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement

मंत्री राऊत यांनी म्हटले आहे की, मंत्रालयातील झारीतील शुक्राचार्य कुणाच्या तरी दबावाखाली येऊन दलित-मागासवर्गीयांची अडवणूक करत आहेत. त्यामुळे पदोन्नतीतील आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अर्थमंत्री पवार यांच्या घरावर मोर्चा काढा. मीही मोर्चात सहभागी होईन.

Advertisement

मागासवर्गीय पदोन्नती उपसमितीच्या अध्यक्षपदावरून राऊत यांनी पवारांना लक्ष्य केले आहे. काँग्रेसच्या अनुसूचित जाती-जमाती विभागातर्फे आयोजित विशेष बैठकीत त्यांनी ही आक्रमक भूमिका घेतली आहे. या बैठकीला काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष व आमदार प्रणिती शिंदे, आमदार राजू पारवे, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष विजय अंभोरे, कार्याध्यक्ष डॉ. जितेंद्र देहाडे उपस्थित होते.

Advertisement

समितीच्या तक्रारीचे मुद्दे असे :

Advertisement
  • तत्कालीन भाजप सरकारने डिसेंबर २०१७ मध्ये काढलेला शासन आदेश करावा
  •  मागासवर्गीयांना पदोन्नतीतील आरक्षण मिळावे यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडण्यासाठी ठोस तयारी करावी
  • आवश्यक आकडेवारीच्या संकलनासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या नियुक्तीचा निर्णय आणि शासन आदेश तातडीने करावा

वीजमाफीची घोषणा मागे घेण्यास लावण्यासह ऊर्जा खात्याचे ११ प्रस्ताव अर्थ खात्याने बासनात गुंडाळून ठेवले असल्याने आता पवार आणि राऊत यांच्यात हे शीतयुद्ध सुरू आहे. राऊत यांनी म्हटले आहे की, ओबीसींच्या प्रश्नावरील उपसमितीचे अध्यक्ष ओबीसी समाजाचे, मराठा आरक्षणाच्या उपसमितीवर मराठा अध्यक्ष, मग मागासवर्गीयांच्या पदोन्नतीच्या उपसमितीचे अध्यक्ष अजित पवार कसे?

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply