Take a fresh look at your lifestyle.

आणि म्हणून गुजरात केडरचे पोलिस अधिकारी भट्ट आलेत चर्चेत; पहा नेमके काय होते त्यांचे प्रकरण

पुणे :

Advertisement

सध्या मुंबई पोलिसांच्या कारनाम्याने अवघा भारत हादरला आहे. त्यावरून ठोस दिशादर्शक कारवाईऐवजी सत्ताधारी आणि विरोधक आंधळी कोथिंबीर खेळत असल्याने या प्रकरणाचे गांभीर्यच कमी झालेले आहे. अशावेळी गुजरात केडरचे पोलीस अधिकारी आणि सध्या तुरुंगात असलेले संजीव भट्ट यांचेही प्रकरण चर्चेत आलेले आहे.

Advertisement

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी भट्ट (Sanjiv Bhatt, Gujrat Police) यांचा मुद्दा आपल्या बचावासाठी पुढे आणला आहे. राऊत यांनी म्हटले आहे की, गुजरातमध्ये एक न्याय आणि महाराष्ट्रात दुसरा न्याय का? एकूणच यामुळे अनेकांना भट्ट म्हणजे नेमके कोण आणि त्यांचे काय प्रकरण होते, असाही प्रश्न पडण्यास सुरुवात झाली आहे.

Advertisement

गुजरातमध्ये आयपीएस अधिकारी भट्ट यांनी गुजरातमधील तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी सरकारबद्दल पत्र लिहून अनेक गोष्टी उघडकीस आणल्या होत्या. त्यावेळी त्या घटनेने देशभरात खळबळ उडाली होती. त्यावेळी त्या पत्राबाबत भाजप सरकारने काय कारवाई केली, असा प्रश्न राऊत यांनी केला आहे.

Advertisement

Sanjiv Bhatt (IPS) on Twitter: “This is Shweta Sanjiv Bhatt, It is now 2 years 4 months and 23 days since Sanjiv was vindictively taken away in an unlawful and politically motivated move by the current regime … https://t.co/UgV0W95s8d #JusticeForSanjivBhatt #FreeSanjivBhatt #EnoughIsEnough” / Twitter

Advertisement

पोलीस अधिकारी भट्ट यांनी वारंवार असे पत्र गुजरात सरकारबाबत लिहिले होते. त्यावर कारवाई तर झालीच नाही. उलट सध्या भट्ट तुरुंगात खितपत पडलेले आहेत. याकडे लक्ष वेधताना राउत यांनी म्हटले आहे की, एका पत्रावरून राज्यसभा, लोकसभेत, मुंबई-महाराष्ट्रात भाजपचे लोक तांडव करत आहेत. त्यांनी गुजरातमध्ये संजीव भट्ट यांनी सरकारशी पत्रव्यवहार करून ज्या गोष्टी उघडकीस केल्या, त्यावरून सरकार का बरखास्त केले नाही? त्या पत्रावरसुद्धा भाजपचे लोक नाचतील का? उलट भट्ट यांना तुरुंगात टाकले. महाराष्ट्रात एक न्याय आणि गुजरातमध्ये दुसरा न्याय का?

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply