Take a fresh look at your lifestyle.

म्हणून 48 हजारांचा ‘तो’ शेअर होऊ शकतो 2.17 लाखांचा; पहा कोणती आहे ही टेक्नोलॉजी कंपनी

मुंबई :

Advertisement

कोणत्याही शेअरमध्ये कधी मोठी गती येईल, किंवा कोणत्या कारणाने कधी त्या कंपनीला फटका बसून त्यातून मोठा लॉस पदरात पडेल याचा काहीही नेम नाही. मात्र, तरीही काही आडाखे असतात ज्यावर मार्केट चालते. आताही पुढील फ़क़्त 5 वर्षात एका कंपनीचे शेअर 48 हजार रुपयांवरून थेट 2 लाख 17 हजार रुपयांवर जाण्याची शक्यता असल्याचे फायनांसिअल एक्प्रेसच्या बातमीत म्हटले आहे.

Advertisement

ती कंपनी आहे एलोन मस्क (Elon Musk) यांची टेस्ला (Tesla). कोरोना महामारीच्या काळातही जगभरातील अनेक व्यावसायिकांच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामागील प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या कंपन्यांचा शेअर वेगाने वाढणे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत मनुष्य असलेल्या एलोन मस्कची कंपनी टेस्लाच्या शेअर्समध्येही मागील वर्षात 671 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Advertisement

सध्या या कंपनीचा प्रतिशेअर भाव 670 डॉलर (48,544.38 रुपये) आहे. टेस्लाच्या शेअर्सची गती येथे थांबणार नाही असे अनेक तज्ञांना वाटते. कॅथी वुड यांच्या एआरके इन्व्हेस्टनुसार पुढील चार वर्षांत 2025 पर्यंत या शेअरची किंमत 347 टक्क्यांनी वाढून 3 हजार डॉलर (2,17,362.90 रुपये) प्रतिशेअरपर्यंत पोहोचू शकेल.

Advertisement

यावर्षी म्हणजे 2021 मध्ये टेस्लाच्या शेअर किंमतीत घट झाली आहे. 2021 मध्ये शेअर किंमत 8 टक्क्यांनी घसरली आहे. नासडॅक कंपोझिट इंडेक्सची (NASDAQ Composite Index) ही कामगिरी आहे. कॅथी वुड यांच्या अंदाजामध्ये बिटकॉइनशी संबंधित आकडेवारी नाही. टेस्लाने 150 करोड़ डॉलर किमतीचे बिटकॉइन (bitcoin) खरेदी केले असून एआरकेने स्टॉक किंमतीवर याचा काय परिणाम होईल याचा अंदाज लावला नाही.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply