Take a fresh look at your lifestyle.

म्हणून मुख्यमंत्र्यांनी मानले केंद्राचे आभार; पहा काय म्हटलेय त्यांनी

मुंबई :

देशातील ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्व नागरिकांना करोना प्रतिबंधक लस देण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाने त्यांची मागणी मान्य केली. याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

Advertisement

कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता, सर्वत्र लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी वयोगटाची अट शिथिल करणे गरजेचे आहे. विशेषतः ४५ वर्षांवरील तरूण वर्ग कामासाठी बाहेर असतो, त्याला प्रतिबंधात्मक लस मिळणे गरजेचे आहे असे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले होते. त्यानुसार केंद्र सरकाने निर्णय घेतल्याने आता लसीकरणाचा वेग वाढणार आहे.

Advertisement

 केंद्रीय मंत्रीमंडळाने ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना करोना प्रतिबंधक लस देण्यासाठी परवानगी दिली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवा आणि करोना योद्ध्यांना लस देण्यात आली. त्यानंतर १६ फेब्रुवारीपासून ६० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पुढील टप्प्यात एक मार्चपासून ४५ हून अधिक वय असणाऱ्या आणि इतर व्याधी असणाऱ्यांचं लसीकरण करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती.

Advertisement

आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या लसीकरणाबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्व नागरिकांना करोना प्रतिबंधक लस उपलब्ध होणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Advertisement

देशात सध्या करोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. त्यामुळे लसीकरणास वेग देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. देशात लसी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांनी लवकर नोंदणी करुन लस घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply