Take a fresh look at your lifestyle.

बिहार विधानसभेत अभूतपूर्व असा गोंधळ; पहा नेमके काय घडले त्याठिकाणी

पटना :

Advertisement

बिहार म्हणजे कोणत्याही राजकीय व गुन्हेगारी दृष्टीने टोकाचे पाउल उचलण्यासाठी प्रसिद्ध असलेले राज्य. आताही याच राज्यात बुधवारी बिहार विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अभूतपूर्व असा गोंधळ उडाला आहे.

Advertisement

पोलिस कायदा बिल 2021 च्या विरोधात जोरदार गदारोळ सुरू असल्याने सभागृहाची कारवाई 4 वेळा तहकूब करण्यात आली. नंतर विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधानसभेचे अध्यक्ष विजय सिन्हा यांना त्यांच्याच सभागृहात बंदी बनवले. यादरम्यान, मकदुमपुरचे राजदचे आमदार सतीश कुमार दास बेशुद्ध झाले.

Advertisement

विरोधी आमदारांची DM आणि SSP सोबत धक्काबुक्कीदेखील झाली. यानंतर एक-एक करत विरोधी आमदारांना सुरक्षा रक्षांनी सभागृहाच्या बाहेर काढले. विरोधी पक्षातील 12-13 आमदार वेलजवळ जाऊन त्यांनी विधेयक फाडले. परिणामी 5:30 पर्यंत कामकाज स्थगित करण्यात आले.

Advertisement

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष विजय सिन्हा आपल्या चेंबरमध्येच कोंडण्याचा प्रयत्न झाला. सध्या त्यांच्या चेंबरबाहेर पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. यादरम्यान ते रिपोर्टर टेबलावर चढले आणि टेबलही तोडला. दुसऱ्यांदा कारवाई सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांच्याकडून CAG रिपोर्ट सादर करताना RJD आमदारांनी प्रचंड गोंधळ घातला.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply