Take a fresh look at your lifestyle.

अर्थव्यवस्था सुधारली, नोकऱ्याही मिळाल्या; पहा कोण म्हणतंय देशात आलेत ‘अच्छे दिन’.!


दिल्ली :

देशात मागील करोना व्हायरसमुळे आणि लॉकडाऊनमुळे देशातील लाखो नागरिकांनी रोजगार गमावले. या काळात जवळपास सर्व व्यवहार ठप्प होते. तसेच उद्योग, कंपन्या देखील बंद पडल्या. या काळात काही कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरू केली. या फटका लाखो कर्मचाऱ्यांना बसला. कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून टाकण्यात आले. आता मात्र वर्षभराच्या काळात या परिस्थितीत सुधारणा झाली आहे.

Advertisement

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या अहवालानुसार जानेवारी २०२१ मध्ये विविध वयोगटातील १३.३५ लाख लोक सापडतील, ते संस्थेत रजिस्टर्ड आहेत. सप्टेंबर २०१७ नंतर प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने नोकऱ्यांची निर्मिती झाली.  

Advertisement

या अहवालात असेही सांगितले गेले आहे की, ज्या नवीन १३.३५ लाख लोकांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत त्यांचे वय गट काय आहे. या अहवालानुसार, यामध्ये २२ ते २५ वयोगटातील सुमारे ३. ४८ लाख नागरिकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. २९-३५ वय असलेल्या लोकांची ही संख्या २.६९ लाख होती. त्यानंतर १८ ते २१ वयोगटातील २.६६ लाख तर ३५ व्या वर्षी नोकरी मिळालेल्याची संख्या २.६ लाख होती.  

Advertisement

करोना महामारीच्या काळात अनेक जणांना रोजगार गमवावे लागले. कंपन्यांनी कर्मचारी कपात करताना महामारीचा बिलकूल विचार केला नाही. बऱ्याच जणांना तर काहीही कारण न देत नोकरीवरुन काढण्यात आले. या संकटाच्या काळात कंपन्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करतील अशी अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरली. अचानक नोकरी गेल्याने लोकांचे हाल झाले. लॉकडाऊन काळात घरांचे हप्ते, पर्सनल लोन तसेच अन्य प्रकारच्या कर्जांचे हप्ते भरताना या बेरोजगारांच्या नाकीनऊ आले.  

Advertisement

दरम्यान, साथीच्या आजारानंतर, नोकऱ्यांचा ग्राफ वाढल्यामुळे देशात रोजगार पूर्वपदावर येत असल्याचे दिसत आहे. महामारीच्या काळात सुमारे पाच लाख लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या होत्या. मार्च आणि एप्रिलमध्ये त्याची टक्केवारी २० पेक्षा जास्त होती. त्याच वेळी, डिसेंबर २०२० मध्ये, त्यात २४ टक्के नवीन नोकऱ्या मिळवणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली. जानेवारी २०२१ मध्ये ही वाढ २७.८ टक्क्यांनी वाढली.

Advertisement

संपदान : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply