Take a fresh look at your lifestyle.

फडणवीस झाले आक्रमक; पहा शरद पवार आणि देशमुखांना कोणत्या मुद्द्यांवर घेरले आहे त्यांनी

मुंबई :

Advertisement

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्राबद्दल सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गदारोळ सुरू आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याप्रकरणी पाठराखण केली आहे. त्याचवेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविषयी मोठा खुलासा केला आहे.

Advertisement

पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले की, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख होम क्वारंटाइन नव्हते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांनी चुकीची माहिती दिली आहे. पोलिस विभागाच्या नोंदीनुसार, बुधवार, दि. 17 फेब्रुवारी रोजी अनिल देशमुख यांचे वेळापत्रक सांगते की ते सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये दुपारी 3 वाजता असणार होते.

Advertisement

फडणवीस म्हणाले की, त्यांच्याकडे एक पत्र आहे. या पत्रावर ते दिल्लीतील केंद्रीय गृहसचिवांना भेटणार आहेत. त्यानुसार ते दिल्लीतील केंद्रीय सचिवांकडे सीबीआयमार्फत संपूर्ण रॅकेटची चौकशी करण्यासाठी आवाहन करतील.

Advertisement

फडणवीस म्हणाले की, पवारांना चुकीची माहिती दिल्याने त्यांनी याबाबत चुकीची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे. दि. 15 ते 27 फेब्रुवारीपर्यंत या कालावधीत अनिल देशमुख यांना अनेकजण भेटले आहेत. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेऊन संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईपर्यंत भारतीय जनता पक्षाचे आंदोलन सुरूच राहिल.

Advertisement

राज्यात ट्रान्सफर-पोस्टिंग रॅकेट सुरू असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मुख्यमंत्री असताना आम्ही हे उघड उघड करून त्या काळात आमच्या सरकारने संबंधितांवर कठोर कारवाई केली. त्याचे फोन रेकॉर्डिंग असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. या रॅकेटचे बरेच तपशील महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही असतील असे त्यांना वाटत आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply