Take a fresh look at your lifestyle.

करोना फोफावतोय; ‘या; शहरात करोना दुपटीचा वेग ९७ दिवसांवर..!


मुंबई :

मार्च महिन्यात राज्यात करोना या घातक आजाराचा फैलाव झपाट्याने होत आहे. राज्यातील मोठ्या शहरात रुग्ण वाढीचा वेग कमालीचा वाढला आहे. राज्याची राजधानी मुंबई शहरात तर करोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी १६७ दिवसांवरुन थेट ९७ दिवसांवर आला आहे.

Advertisement

करोना रुग्ण वाढीमुळे प्रशासनाचा ताण वाढला आहे. रुग्णांची वाढत जाणारी संख्या विचारात घेऊन महापालिकेने रुग्णालयातील खाटा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.  मुंबईतील शहरातील कोरोना रुग्णदुपटीचा कालावधी १८६ दिवसांवरुन ९७ दिवसांवर घसरला आहे. हा बदल फक्त एका आठवड्यात झाला आहे. गेल्या आठवड्यात मुंबईतील रुग्णसंख्येने साडेतीन हजारांचा टप्पा पार केला आहे.

Advertisement

मुंबई उपनगरांत असलेल्या एकूण ९ रुग्णालयात पुन्हा कोरोना रुग्णांवर उपचार करणे सुरू केले जाणार आहे. यासाठीच महापालिकेने अशा रुग्णालयांना दोन दिवसांत खाटा उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या ९ रुग्णालयांमध्ये पुढील आठवड्यात सोमवारपासून कोरोना रुग्णांना दाखल करणे सुरू केले जाणार आहे. दरम्यान, मुंबई व्यतिरिक्त राज्यातील पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर या मोठ्या शहरांतही रुग्ण वाढत आहेत. तसेच लहान शहरे आणि ग्रामीण भागातही करोना फैलावत आहे.

Advertisement

त्यामुळे राज्य सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. राज्यात करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे तर दुसरीकडे रुग्ण वाढही होत असल्याने कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्याप्रमाणेच देशातही करोनाचे रुग्ण वाढत असल्याने लसीकरणास वेग देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. देशातील ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्व नागरिकांना करोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांनी नोंदणी करुन लस घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply