Take a fresh look at your lifestyle.

बिटकॉइनवाल्यांना असा बसणार झटका; पहा मोदी सरकार कोणते कायदे आणणार आहे ते

पुणे :

Advertisement

सध्या बिटकॉइनसह सर्व क्रिप्टोकरन्सीवरील बातम्या जोमात असतात. त्या आभासी चलनाने कोणाला किती मालामाल केले आणि कोणाचे लाखाचे बारा हजार झाले या बातम्यांना ट्रेंडमध्ये मोठी जागाही असते. अनेकांनी या आभासी चलनाला आपलेसे केलेले असतानाच त्यांना झटका देण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे.

Advertisement

एकीकडे डिजिटल चलनात दररोज नवीन उच्चांक प्रस्थापित होत असतानाच दुसरीकडे सरकारकडून क्रिप्टोकरंसीवरील बातम्यांचा बाजारही चर्चेत आहे. न्यूज एजन्सी रॉयटर्सने दिलेल्या बातमीनुसार बिटकॉइनसह सर्व क्रिप्टोकरन्सीवरील बंदीची तयारी केंद्र सरकारने पूर्ण केली आहे.

Advertisement

क्रिप्टोकरन्सीवरील नवीन कायद्याच्या बातमीमध्ये म्हटले आहे की, भारत सरकार गुन्हेगारीच्या क्रिया म्हणून याला यापुढे गृहीत धरणार आहे. त्यानुसार क्रिप्टोकरन्सी ठेवण्यासह जारी करणे, साठवणे, त्याचा व्यापार कारणे आणि हस्तांतरित करण्यासाठीच्या बंदीचा कायदा येणार आहे. कायदा बनवण्याची ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. जर असा कायदा आला तर कायद्यामध्ये बिटकॉइन आणि इतर क्रिप्टो गुंतवणूकदारांना शिक्षा होऊ शकते.

Advertisement

इंडिया टुडे कोन्क्लेवमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे की, सरकार क्रिप्टोकरेंसी, ब्लॉकचेन किंवा फिनटेक याला बंद करण्याच्या विचारात नाही. मात्र, सुप्रीम कोर्टाने याबाबत विचारणा केली आहे. त्यानुसार रिझर्व बँक त्यांच्या स्तरावर अशी डिजिटल करन्सी आणण्याच्या विचारात आहे.

Advertisement

बिटकॉइन आणि अशा प्रकारच्या अन्य डिजिटल चलनांवर बंदी आल्याबद्दल गुंतवणूकदार आधीच आशंकित होते. तथापि, सरकारच्या ताज्या निवेदनातूनही गुंतवणूकदारांना दिलासा मिळणार आहे. कारण, सर्व रस्ते बंद न करण्याचे निर्मला सीतारमण यांनी म्हटलेले आहे.

Advertisement

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनीही क्रिप्टोकरंसीवर म्हटले होते की, आपण मुक्त विचारांनी नवीन कल्पनांना प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यामुळे कायदा कितपत प्रभावी असेल किंवा अशा व्यक्तींना शिक्षा कितपत असेल याबाबत अजूनही ठोस माहिती पुढे येऊ शकलेली नाही.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply