Take a fresh look at your lifestyle.

गुडन्यूज.. ४५ वर्षांवरील सर्वांना मिळणार करोना लस..!


दिल्ली :

Advertisement

देशभरात करोनाचा कहर वाढत असताना केंद्र सरकारने आता एक महत्वाचा निर्णय घेतल आहे. देशात करोनाचे रुग्ण वाढत असल्याने लसीकरणास वेग देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार आता १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना करोना प्रतिबंधक लस घेता येणार आहे. यासाठी पात्र असणाऱ्या नागरिकांनी नोंदणी करुन लस घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

 केंद्रीय मंत्रीमंडळाने ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना करोना प्रतिबंधक लस देण्यासाठी परवानगी दिली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवा आणि करोना योद्ध्यांना लस देण्यात आली. त्यानंतर १६ फेब्रुवारीपासून ६० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली.

Advertisement

त्यानंतर पुढील टप्प्यात एक मार्चपासून ४५ हून अधिक वय असणाऱ्या आणि इतर व्याधी असणाऱ्यांचं लसीकरण करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या लसीकरणाबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्व नागरिकांना करोना प्रतिबंधक लस उपलब्ध होणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Advertisement

देशात सध्या करोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. त्यामुळे लसीकरणास वेग देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. देशात लसी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांनी लवकर नोंदणी करुन लस घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

फेब्रुवारीमध्ये दिवसाला तीन लाख ७७ हजार करोनाचे डोस दिले जायचे. मार्च महिन्यात ही दैनंदिन आकडेवारी १५ लाख ५४ हजारांपर्यंत गेली आहे. मागील आठवड्यामध्ये दिवसाला करोना लसींचे २० लाख डोस देण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव  

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply