Take a fresh look at your lifestyle.

आरोग्य सल्ला : उभा राहून पाणी पिण्याची सवय बदला आणि ‘हे’ आजार पळवा

आता उन्हाळ्यात आपले पाणी पिण्याचे प्रमाण अपोआप वाढते. अशावेळी आपण उभा राहून जास्त प्रमाणात पाणी पितो. मात्र, या सवयीचे काही तोटेही आहेत.

Advertisement

आपल्या शरीराला पाणी फार गरजेचे असते. पाण्याशिवाय आपण आपल्या शरीराचा विचारच करू शकत नाही. सर्व आजारांना दूर ठेवण्यासाठी पाणी फार पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी भरपूर पेल्याने आपले आजार दूर राहतात. जास्तीत जास्त पाणी पिण्यामुळे ताजेतवाने राहायला सर्वात जास्त मदत होते.

Advertisement

पण पाणी किती पिता यापेक्षा पाणी कसे पिता हे पण फार महत्वाचे आहे. आपण काही बाबतीत सावधगिरी बाळगायला पाहिजे. अनेक लोकांना उभा राहून पाणी पिणे तसेच तोंडाला बाटली लाऊन पाणी पिणे, पाणी गटा-गटा पिणे अशा सवयी असतात. याप्रकारे पाणी पिऊन तुम्ही बऱ्याच रोगांना अनावधनाने निमंत्रणच देत असता. अशा पद्धतीने पाणी पिणे आरोग्याला हानिकारक असते. याने लिव्हर व किडनीवर जास्त परिणाम होतो. त्यामुळे अशा वाईटसवयीचा परिणाम आपल्याला माहित असणे आवशक आहे.

Advertisement

उभा राहून पाणी पिऊ नये. बऱ्याच लोकांना आता उन्हाळ्यात घाईघाईने फ्रीजजवळ येऊन उभे राहून पाणी पिण्याची सवई असते. तोंडाला बाटली लाऊन पाणी पितात याचे काय दुष्परिणाम होतात ते पहा.

Advertisement

यामुळे झटक्यात ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा कमी होतो. त्यामुळे फुफुसावर याचे दुष्परिणाम दिसतात. हृदयावर तसेच ओटी-पोटावर याचा परिणाम होतो. यामुळे हर्नियासारख्या आजारला सामोरे जावे लागते. अनेक अवयवांवर याचा दुष्परिणाम होतो.

Advertisement

उभ्याने पाणी पिण्याचा किडनीवरही परिणाम होतो. आपण ज्यावेळेस उभा राहून पाणी पितो. तेव्हा पाणी डायरेक्ट फिल्टर न होता ओटीपोटात वेगाने जाते. यामुळे काही प्रमाणात का होईना किडनी खराब होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

Advertisement

यामुळे शारीरिक ताणतणाव वाढतो. उभ्याने पाणी पिण्याचे असे अनेक दुष्परिणाम आहेत. तसेच उन्हातून येऊन लगोलग गार पाणी पिण्यानेही अनेकदा गंभीर दुष्परिणाम दिसू शकतात.

Advertisement

संपादन : सुनील झगडे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply