Take a fresh look at your lifestyle.

नोकरदारांना अच्छे दिन; पहा कोणी दिली पगारवाढ अन् निवृत्ती वयही वाढवून दाखवले..!

हैदराबाद :

Advertisement

तेलंगाणा राज्य सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर दिली आहे. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार ३० टक्क्यांनी वाढवला आहे. तसेच निवृत्तीचे वय देखील तीन वर्षांनी वाढवले आहे. निवृत्तीचे वय ५८ वरुन ६१ करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी विधानसभेत ही घोषणा केली आहे. राज्यातील जवळपास नऊ लाख कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

Advertisement

 राज्यात १ एप्रिल पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासह अतिरिक्त १५ टक्के पेन्शन वाढविण्याच्या वयाची मर्यादा सध्याच्या ७५ वर्षांवरून कमी करुन ७० वर्षे केली जाणार आहे. सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना देण्यात आलेली जास्तीत जास्त ग्रॅच्युटी सध्याच्या १२ लाखांवरून १६ लाख रुपये करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, करोनामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम झालेला असतानाही राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Advertisement

२०१४ च्या सुरुवातीस राज्य सरकारने सरकारी कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये वाढ केली होती. त्यावेळी राज्य सरकारने कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये सुमारे ४३ टक्के वाढ केली होती. सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारे निर्णय केंद्र व राज्य सरकारांकडून वेळोवेळी घेण्यात येतात. सध्या देशभरात करोना विषाणूचे संकट आहे. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील वर्षात देशभरात कडक लॉकडाऊन केला होता.

Advertisement

या काळात देशाच्या आणि राज्याच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम झाला. अनेक कंपन्या, उद्योग बंद पडले. खासगी क्षेत्रातील अनेक कर्मचाऱ्यांचे रोजगार गेले. देशाची अर्थव्यवस्था देखील कोलमडली. नवीन वर्षाच्या सुरुवातील काही काळ रुग्ण संख्या कमी होत होती.

Advertisement

त्यामुळे आजार आटोक्यात येत असल्याचे चित्र दिसत होते. त्यानंतर मार्च महिन्यात मात्र सारे काही पालटले आहे. करोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. त्यामुळे राज्य सरकारांकडून पुन्हा कडक उपाययोजना केल्या जात आहेत. देशाच्या काही भागात निर्बंध आधिक कठोर करण्यात आले आहेत.  

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply