Take a fresh look at your lifestyle.

अशी ओळखा दुध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ; जाणून घ्या साध्या, सोप्या व घरगुती ट्रिक्स

दुधाचा वापर होत नाही असे भारतीय घरांमध्ये शक्यच नाही. दूध कोणत्या ना कोणत्या रूपात आहारात सामील होत असतेच. मात्र, गेल्या काही वर्षांपासून दूध आणि दुधापासून बनवलेल्या उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते. या धंद्यातील काही पदार्थ (दुध, तूप, मावा आणि त्यापासून बनवलेले अजून काही पदार्थात) भेसळयुक्त आढळून येत आहेत.

Advertisement

जर तुम्हाला दुधाचे पदार्थ खरेदी करायचे असतील तर ते खरे का भेसळयुक्त हे जाणून घायचे असेल तर आपण घरी पण जाणून घेऊ शकतो.

Advertisement

दुधापासून बनवलेल्या उत्पादनांममध्ये पनीर, खवा, रबडी, गोड दही इत्यादी साफ आणि शुद्ध दिसण्यासाठी अनेक पदार्थ मिसळले जातात. जसे युरिया, स्टार्च, वनस्पती तूप, फॉर्मेलिन, सल्फ्युरिक अॅसिड, कोल, डाय आणि ब्लॉटिंग पेपर इत्यादी. स्टार्च आणि वनस्पती हे कमी भेसळीचे असतात. तर तारकोल डायमधील काही घटक आपल्या मेंदूला नुकसान पोहोचवू शकतात. 

Advertisement

यातील भेसळ ओळखण्यासाठी एका भांड्यात दुधाचा थेंब टाका. जर दुध सफेद निशाण सोडत खाली पडला तर दूध शुद्ध आहे. जर दूध कोणतेही निशाण सोडण्याआधी खाली घसरले तर यात भेसळ आहे. यानुसार दुधात पाणी आहे का नाही हेही समजते.  

Advertisement

दुधामध्ये स्टार्च आहे की नाही हे जाणून घेण्याची सगळ्यात चांगली पद्धत म्हणजे आयोडिन. दुधाच्या एका थेंबात आयोडिन टाका. दुधाचा रंग निळा झाल्यास त्यात स्टार्च मिसळलेले आहे. 

Advertisement

तुमच्या घरात येणाऱ्या दुधात युरियाची भेसळ केली जात असेल तर एका भांड्यात थोडे दूध घ्या. यात एक चमचा तुरीचे पीठ आणि सोयाबीन मिसळा. मिश्रण चांगले एकजीव करा. पाच मिनिटांसाठी तसेच ठेवा. यात लाल लिटमस पेपर बुडवा. कागद निळा झाल्यास यात युरियाची भेसळ आहे. 

Advertisement

दुधात वनस्पती तेल हा घटक आहे आहे की नाही हे शोधण्यासाठी ३ मिली दुधामध्ये हायड्रोक्लोरिक अॅसिडचे काही थेंब टाका. यात एक चमचा साखर मिसळा. दूध लाल रंगाचे झाल्यास त्यात भेसळ आहे असे समजा. 

Advertisement

सिंथेटिक दुधाची ओळख पटवण्याचा मार्ग म्हणजे ते बोटांवर रगडणे. याशिवाय ते गरम केल्यास याचा रंग पिवळा पडतो. 

Advertisement

पनीर भेसळ

Advertisement

फिजीकल टेस्ट : पनीरची शुद्धता त्याच्या मुलायमतेवरून असते. पनीरचा तुकडा हातात ठेवून तो दाबून बघा. पनीरचे तुकडे झाल्यास त्यात भेसळ आहे. 
केमिकल टेस्ट : थोड्या पाण्यात पनीरचे काही तुकडे उकळून घ्या. थंड झाल्यावर यावर आयोडिनचे काही थेंब टाका. हे निळे झाल्यास यात स्टार्च मिसळले आहे असे नक्की.

Advertisement

खवा अथवा माव्यामधील भेसळ कशी ओळखाल

Advertisement

तुम्ही जो खवा खरेदी करत आहात तो शुद्ध आहे की भेसळयुक्त हे ओळखण्यासाठी यात स्टार्च आहे की नाही ते ओळखा. यासाठी खवा उकळून घ्या. थंड केल्यानंतर आयोडिनचे काही थेंब टाका. हे निळ्या रंगाचे झाल्यास खवा भेसळयुक्त आहे. 

Advertisement

तूप

Advertisement

एका छोट्या चमच्यामध्ये वितळलेले तूप घ्या. यात ५ मिलि Hcl मिसळा. जर तुपाचा रंग क्रिमसन अथवा गुलाबी झाल्यास तुपामध्ये भेसळ आहे.

Advertisement

संपादन : सुनील झगडे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply