Take a fresh look at your lifestyle.

बापरे.. ‘या’ ब्लड ग्रुपच्या लोकांमध्ये असतो डायबेटीस जास्त धोका..!

भारताला जगभरातील डायबेटीसची राजधानी मानले जाते. खाणे, पिणे आणि लाइफस्टाइलशी संबधित हा आजार आहे. हा आजार आटोक्यात ठेवण्यासाठी काही गोष्टीची काळजी घेणे आवश्यक असते. खराब जीवनशैलीच्या आधारे होणारा टाईप 2 डायबेटीस याद्वारे कमी होऊ शकतो. चुकीच्या जीवनशैली व्यतिरिक्त अन्य काही करणामुळे हा धोका कमी करू शकतो. याशिवाय इतर अनेक कारणानेही डायबेटीस होऊ शकतो.

Advertisement

जर्मन देशात प्रकाशित झालेल्या माहिती नुसार O ब्लड ग्रुप असलेल्या लोकांच्या तुलनेत नॉन O ब्लड गुप असलेल्या लोकांना डायबेटीसचा धोका जास्त असतो.

Advertisement

जर्मनीमध्ये 80 हजार महिलांच्या केलेल्या सर्वेक्षणात ब्लड ग्रुप आणि टाईप 2 डायबेटीस धोका यांच्यातील संबंध आढळून आला. यातील 3553 लोकांना टाईप 2 डायबेटीस आढळून आला. तर, नॉन O प्रकारच्या लोकांना डायबेटीसचा धोका जास्त आढळून आला.

Advertisement

आभ्यासानुसार A ब्लड ग्रुप असणाऱ्या महिलांना टाईप 2 डायबेटीस  10% धोका असतो. B ब्लड ग्रुपच्या महिलांना 21 % धोका जास्त असतो. तर O रक्त गटाच्या तुलनेत B+ रक्त गटास टाईप 2 डायबेटीस धोका जास्त असतो.

Advertisement

B रक्त गटाच्या लोकांमध्ये डायबेटीस होण्याचे प्रमाण जास्त असते. कारण प्रत्येक रक्तगट हा वेगळा असतो. संशोधकांच्या मते रक्तगट वेगवेगळ्या अनुशी जोडलेले असतात. त्यामुळे काहींना डायबेटीस होण्याचा धोका वाढतो.

Advertisement

जर एखाद्द्या व्यक्तीस टाईप 2 डायबेटीसचा त्रास होत असेल तर ते साखर नियंत्रित आणि वापराच्या मार्गावर परिणाम करते. यामुळे रक्ताच्या साखरेची पातळी वाढते. वेळेवर उपचार न केल्यास ते धोकादायक ठरू शकते. त्यामुळे आशावेळी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक असतो. वेळेत उपचार न केल्यास याचा धोका जास्त होऊ शकतो. त्यामुळे जीवनशैली सुधारणे हा योग्य पर्याय राहील, असेही तज्ञांनी म्हटले आहे.  

Advertisement

संपादन : सुनील झगडे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply