Take a fresh look at your lifestyle.

वाव.. धासू.. रॉयल एनफिल्ड आलीय नव्या रुपात; दोन नवे लूक येणार ग्राहकांच्या भेटीला..!

पुणे :
बुलेट म्हटली की रॉयल एनफिल्डचीच.. या कंपनीच्या बुलेटना देशभरात मागणी आहे. त्यामुळे कंपनीने या गोष्टी विचारात घेऊन मोटार सायकलमध्ये अनेक बदल केले आहेत. कंपनीकडून नेहमी नवनीवन मोटार सायकल बाजारात आणल्या जात आहेत. आताही कंपनीने आज ६५० ट्विन मोटार सायकल्स- इंटरसेप्टर ६५० ट्विन आणि कॉन्टिनेंटल जीटी – ६५० या दोन नवीन कलरवेजच्या लाँचची घोषणा केली.

Advertisement

कंपनीने इंटरसेप्टर ६५० मध्ये विविध एमआयवायद्वारे अनेक नवीन ऑफर्स आणल्या आहेत. जेणेकरून तिचे रोडस्टर अपील वाढले. इंटरसेप्टर ६५० दोन नवीन सीटचे पर्याय- स्‍टॅण्‍डर्ड टूरिंग ड्युअल सीट व स्टाइल स्टिचिंगसह टुरिंग सीट आणि काऊल फिनिश हेही आणण्यात आले आहे.

Advertisement

इंटरसेप्टर ६५० वर संरक्षण वाढवण्यासाठी इंजिन गार्डस् आणि सम्प गार्ड्स विविध फिनिशेसमध्ये उपलब्ध आहेत. कॉन्टिनेंटल जीटी ६५० च्या कॅफे रेसर स्टाइलमध्ये भर घालताना एमआयवायमध्ये आता अनेक पर्सनलायझेशन आणि अ‍ॅक्सेसरायझेशन पर्याय आहेत जसे काळ्या रंगात पेंटेड स्क्रीन किट, बार एंड मिरर्स, सिंगल सीट काऊल विविध रंगांमध्ये उपलब्ध आहेत.

Advertisement

सप्टेंबर २०१८ मध्ये बाजारात आलेल्या ६५० ट्विन्सचेभारतातील तसेच जगभरातील मोटरसायकल्सच्या चाहत्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. इंडियन मोटरसायकल ऑफ दि इयर २०१८ या पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही ही मोटार सायकल यशस्वी ठरली आहे. रॉयल एनफिल्ड हा यूकेमधील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या मोटरसायकल ब्रँडपैकी एक ठरला आहे.

Advertisement

आताही कंपनीने दोन नवीन मोटार सायकल नव्या रुपात लाँच केल्या आहेत. भारतीय बाजारपेठेत कंपनीच्या मोटार सायकलना मागणी वाढली आहे. बुलेट वाहनांचे विश्व आज पुरते बदलले आहे. विविध रूपांत आज बुलेट उपलब्ध आहेत. कंपन्यादेखील या वाहनांत वेळोवेळी बदल करीत असतात. आज बुलेट विविध प्रकार व रंगात उपलब्ध आहेत. रॉयल एनफिल्ड कंपनीच्या बुलेट क्लासिकला सर्वांत जास्त मागणी आहे. या प्रकारातील स्टिल्थ ब्लॅक हा रंग नागरिकांच्या पसंतीस उतरला आहे. ‘थंडरबर्ड’, ‘इंटरसेप्टर’, ‘हिमालयन’ या मॉडेलनाही चांगली मागणी आहे.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply