Take a fresh look at your lifestyle.

म्हणून कारच्या किमतीत होणार वाढ; पहा कशामुळे, कधीपासून खिशाला पडणार झळ..!

मुंबई :

Advertisement

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी असेलेल्या मारुती सुझुकी कंपनीने आपल्या सर्व मॉडेल्सच्या किंमती पुढील महिन्यापासून वाढवण्याची घोषणा केली आहे. कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याने किंमत वाढवण्यात येत असल्याचे कंपनीने सांगितले आहे. या कंपनीने भाववाढ केल्यावर इतर कंपन्याही असाच कित्ता गिरवतील असे अनेकांना वाटत आहे.

Advertisement

कंपनीचे कार्यकारी संचालक (विक्री व विपणन) शशांक श्रीवास्तव म्हणाले की, उत्सर्जन निकषांबाबतचे नियम गेल्या वर्षी एप्रिलपासून लागू झाले आहेत. यासाठी संबंधित अनेक खर्च आहेत. त्यामुळे आम्ही किंमत वाढवण्याचा विचार केला होता. तथापि, गेल्या वर्षी बाजारपेठ चांगली नव्हती. तेव्हा आम्ही किंमत वाढवू शकलो नाही. मात्र, आता त्यात वाढ करीत आहोत.

Advertisement

ते म्हणाले की, आता कच्च्या मालाची किंमत, विशेषत: स्टील, प्लास्टिक आणि दुर्मिळ धातूंच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे ही वाढ करावीच लागणर आहे. करोना या साथीच्या रोगानंतर आम्ही मागणी वाढवण्याचा प्रयत्न करीत होतो आणि म्हणूनच आम्ही दरवाढ कमी केली होती.

Advertisement

जानेवारीमध्ये असेही वाटलं होतं की कच्च्या मालाची किंमत जास्त राहणार नाही आणि ती घसरेल. परंतु, आताच्या अंदाजानुसार, किंमत पुढील काही तिमाहीत ती उच्च राहील. म्हणून, कंपनीची इच्छा नसतानाही आम्ही किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.

Advertisement

ते म्हणाले की, किंमत वाढ ही मॉडेलवर अवलंबून असेल. यापूर्वी, यावर्षी 18 जानेवारीला मारुती सुझुकीने किंमत वाढीचा हवाला देत निवडक मॉडेल्सवर 34,000 रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली होती. मारुती सुझुकी देशात मोठ्या प्रमाणात गाड्या विकत आहे. या छोट्या कार अल्टोपासून प्रीमियम क्रॉसओवर एस-क्रॉसपर्यंत आहेत. त्यामुळे नवी कर घेणाऱ्या ग्राहकांना याचा फटका सहन करावा लागणार आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply